मिथिलेश गुप्ता, प्रतिनिधी, ठाणे
ADVERTISEMENT
ठाणे जिल्ह्यातील कल्याण शीळ रस्त्यावरची एमआयडीसीची जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. रस्त्यांवर पुरासारखे पाणी वाहत असून जवळपासच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण शीळ रोडवरील चिंतामणी हॉटेलजवळ एमआयडीसीची पाण्याची जलवाहिनी फुटली आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. रस्त्यांवर पुरासारखे पाणी वाहू लागले आणि जवळपास असलेले घरांमध्ये पाणी शिरले.
गेल्या महिन्यापासून आतापर्यंत चार ते पाचवेळा पाईपलाइन फुटली आहे. एकीकडे डोंबिवली, कल्याण आणि दिवा शहरात लोकांना पाण्यासाठी आंदोलन करावे लागत आहे तर दुसरीकडे जलवाहिन्या फुटण्याची सत्र सुरूच आहे. लाखो लिटर पाणी वाया जातं आहे.
पाईपलाईन फुटल्याने डोंबिवलीकरांचे हाल होत आहेत. गेल्या पंधरा दिवसात पाईपलाईन फुटण्याची ही तिसरी ते चौथी वेळ आहे. आजच डोंबिवली एमआयडीसी कार्यालयावर नागरिकांचे पाण्यासाठी आंदोलन केलं. दिवाळी बलिप्रतिपदा, पाडवा मुहूर्तावर आणि गेल्या काही दिवसांपासून अनियमीत पाणी पुरवठा होत असल्याने याबाबत जाब विचारण्यासाठी अंदाजे 30 महिला पुरुष जणांनी आज सकाळी 11 ते 12 दरम्यान एमआयडीसी कार्यालयावर हंडा, बादली घेऊन आंदोलन करण्यात केले.
विशेष म्हणजे हे आंदोलन राजकीय पक्ष विरहित कुठलाही बॅनर न घेता, वापरता उत्स्फूर्तपणे सर्वांनी केले. आम्ही एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता रमेश पाटील यांना फोन करून कार्यालयात येऊन त्रस्त नागरिकांना भेटण्याची विनंती केली मात्र सुट्टी असल्याने त्यांनी आपल्या पाणी पुरवठा खात्याचे टेक्निशियन चीनावाले यांना त्वरित कार्यालयात पाठविले. त्यांनी सर्वांना आपल्या कार्यालयात बोलवून घेऊन पाणी बंद विषयी त्यांचा अडचणी सांगून दुपारी अडीच वाजेपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत चालू होईल असे सांगितले आहे.
यानंतर त्रस्त नागरिकांनी एमआयडीसीच्या विरूध्द निषेधाचा घोषणा त्यांचा कार्यालयात आणि गेट बाहेर देऊन आपला राग व्यक्त केला. याप्रसंगी राजू नलावडे, भालचंद्र म्हात्रे, संजय चव्हाण, वर्षा महाडिक, प्रिया दामले, आनंद दामले, प्रफुल बोरकर, विश्राम परांजपे, मुकुंद साबळे, के सुब्रमण्यम, मकरंद जोशी, विनय नायर, फ्रान्सिस, भाऊ गुप्ते, वृषाल घरत, निहाल आंबेरकर, सुरेश पावसकर, निनाद शिरसाठ, सुनील आणि कनिका गद्रे इत्यादी उपस्थित होते. तसेच मानपाडा पोलीस आणि प्रसारमध्यामांचे प्रतिनिधी हजर होते. अशात आजच पुन्हा पाईपलाईन फुटल्याची बातमी समोर आली आहे.
ADVERTISEMENT