ट्युशनसाठी घरी येणाऱ्या शिक्षिकेचं बाथरूमध्ये मोबाईल लपवून १६ वर्षांच्या मुलाने चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. हा मुलगा सध्या दहावीत शिकत असून त्याच्या आई-वडिलांनी त्याच्यासाठी मागी पाच वर्षांपासून इंग्रजी खासगी शिकवणी लावली होती. हा मुलगा १० वर्षांचा असल्यापासून ही शिक्षिका त्याला इंग्रजी शिकवते.
ADVERTISEMENT
ही शिक्षिका कोथरूडमध्ये त्याच्या घरी शिकवायला जात होती. गुरूवारी नेहमीप्रमाणे ही शिक्षिका त्या मुलाच्या घरी बाथरूमचा वापर करायला गेली असता त्या शिक्षिकेला साबणाच्या खोक्याच्या मागे काहीतरी चमकता दिसलं. साबणाचं खोकं बाजूला केलं असता त्यामागे मोबाईल लपवण्यात आला असल्याचं आणि व्हीडिओ रेकॉर्डिंग सुरू असल्याचं शिक्षिकेला लक्षात आलं आहे. त्यानंतर शिक्षिक मोबाईल घरी घेऊन गेली आणि तिने मोबाईल तपासला.
हा मोबाईल पाहून शिक्षिकेच्या पायाखालची जमीन सरकली. त्यामध्ये या शिक्षिकेचं बाथरूममध्ये केललं चित्रीकरण दिसून आलं. एवढंच नाही तर इतर आक्षेपार्ह फोटो आणि व्हीडिओही आढळून आले. यानंतर या शिक्षिकेने पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलाविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी आय.टी. अॅक्टनुसार मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा मुलगा अल्पवयीन असल्याने बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यासमोर त्याला हजर करण्यात येणार आहे.
ADVERTISEMENT