धक्कादायक… आसारामच्या आश्रमात कारमध्ये सापडला अल्पवयीन मुलीचा मृतदेह

मुंबई तक

• 07:48 AM • 08 Apr 2022

गोंडा (उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेशमधील गोंडा येथे आसारामच्या आश्रमात अल्टो कारमध्ये एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुलीचे वय सुमारे 13-14 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. आसारामच्या आश्रमात मृतदेह सापडल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण विमौर येथील आहे. इथे […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

गोंडा (उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेशमधील गोंडा येथे आसारामच्या आश्रमात अल्टो कारमध्ये एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुलीचे वय सुमारे 13-14 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. आसारामच्या आश्रमात मृतदेह सापडल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण विमौर येथील आहे. इथे आसारामचा आश्रम आहे. मृत मुलगी ही 5 एप्रिलपासून बेपत्ता होती. तिचा गेल्या तीन दिवसापासून शोध सुरु होता. मात्र आज थेट तिचा मृतदेहच सापडला आहे. एका कारमधून दुर्गंधी येत असल्याने ही घटना उघडकीस आली. ज्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालायत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमधून दुर्गंधी आल्यानंतर आश्रमाच्या चौकीदाराने कार उघडली तेव्हा त्याला त्यात मृतदेह आढळून आला. त्यानंतर त्यांनी तात्काळ याबाबतची माहिती पोलिसांना माहिती दिली. मृतदेह मिळाल्यानंतर पोलीस आणि फॉरेन्सिक टीम आश्रम आणि वाहनाची चौकशी करत आहे.

गुजरातमध्येही सापडले होते 2 विद्यार्थ्यांचे मृतदेह

आसारामच्या आश्रमातून मृतदेह सापडण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अशा घटना समोर आल्या आहेत. 2008 मध्ये गुजरातमधील आसारामच्या आश्रम ‘गुरुकुल’मधून 2 जण रहस्यमयररित्या गायब झाले होते. त्यानंतर 5 जुलै 2008 रोजी साबरमती नदीच्या काठावर विद्यार्थ्यांचे मृतदेह आढळून आले होते.

छिंदवाडा आश्रमातही सापडला होता मृतदेह

गुजरातपाठोपाठ मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील गुरुकुल आश्रमातही एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. ही घटना देखील 2008 सालीही घडली होती. आश्रमाच्या शौचालयात मुलाचा मृतदेह आढळून आला. मात्र, विद्यार्थ्याच्या मृत्यूचे कारण बाथरूममध्ये पडून झाला असल्याचे सांगण्यात आले होते.

पिता-पुत्रावर बलात्काराचा आरोप

दुसरीकडे आसाराम आणि त्याचा मुलगा नारायण साई यांच्यावर सुरतमध्ये राहणाऱ्या दोन बहिणींनी बलात्काराचा आरोप केला होता. ज्यामध्ये मोठ्या बहिणीने आसारामवर बलात्काराचा तर लहान बहिणीने नारायण साईवर बलात्काराचा आरोप केला होता. या प्रकरणी पोलिसांनी आसारामविरोधात आरोपपत्रही दाखल केले होते. मात्र, या प्रकरणाची सुनावणी बराच काळ झाली नव्हती.

बलात्कार प्रकरणात दोषी आढळला आसाराम

आसारामला 2013 साली त्याच्या आश्रमातील एका मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवले होते. ही मुलगी अल्पवयीन होती. 15 ऑगस्ट 2013 च्या रात्री आसारामने जोधपूरजवळील मणाई भागातील आपल्या आश्रमात बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप तरुणीने केला होता. याच प्रकरणी 2013 पासून जोधपूर मध्यवर्ती कारागृहात आसाराम शिक्षा भोगत आहे. 2018 मध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. आसारामने जामिनासाठी अनेक वेळा याचिका दाखल केल्या आहेत. मात्र प्रत्येक वेळी त्याचे प्रयत्न फोल ठरले आहेत.

जोधपूर: जेलमध्ये असलेल्या आसाराम बापूंची तब्येत बिघडली, उपचार सुरु

आसारामचा मुलगाही बलात्कार प्रकरणात तुरुंगात

त्याचवेळी आसाराम याचा मुलगा नारायण साईच्या अडचणीत वाढ झाली आहे. नारायण साई सध्या सुरतच्या लाजपूर तुरुंगात आहे. तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी नारायण साईने न्यायालयासमोर चुकीची कागदपत्रे सादर केली होती.

यामध्ये त्याची आई आजारपणामुळे रुग्णालयात दाखल असल्याचे सांगण्यात आले होते. तिच्या उपचारासाठी त्याला जामीन हवा असल्याचे नमूद करण्यात आले होते. दरम्यान, हायकोर्टाने जामिनाची कागदपत्रे तपासण्याचे आदेश पोलिसांना दिले.

नारायण साईने चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे जामीन घेतल्याचे पोलिस तपासात उघड झाले. यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अहमदाबादमधील सोला पोलीस ठाण्यात नारायण साईविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    follow whatsapp