Osmanabad : आमदार कैलास पाटील यांचं आजपासून आमरण उपोषण; ओला दुष्काळ जाहीर करण्याची प्रमुख मागणी

मुंबई तक

• 07:50 AM • 24 Oct 2022

शेतकऱ्यांच्या विविध मागणीसाठी उस्मानाबादचे उद्धव ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील हे अमरण उपोषणाला बसले आहेत.अतिवृष्टीची नुकसान भरपाई,पीक विम्याचे पैसे सरकार आणि विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना मिळत नसल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक झाला आहे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी आणि त्यांची दिवाळी गोड व्हावी, त्याच बरोबर ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी ऐन […]

Mumbaitak
follow google news

शेतकऱ्यांच्या विविध मागणीसाठी उस्मानाबादचे उद्धव ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील हे अमरण उपोषणाला बसले आहेत.अतिवृष्टीची नुकसान भरपाई,पीक विम्याचे पैसे सरकार आणि विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना मिळत नसल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक झाला आहे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी आणि त्यांची दिवाळी गोड व्हावी, त्याच बरोबर ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी ऐन दिवाळीच्या दिवशीपासून उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील (सोमवार) आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत.

हे वाचलं का?

काय म्हणाले कैलास पाटील?

सर्वोच्च न्यायालयाने 2020 आणि 2021 चे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याचे आदेश दिले असताना सुद्धा 2020 सालचे 200 कोटी वगळता इतर रक्कम मिळत नाहीत, यापेक्षा कोणतं दुर्दैव नाही, असं कैलास पाटील म्हणाले. यासह सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मागणी करुन सुद्धा का मिळत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दिवाळीपूर्वी ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करुन त्यांची दिवाळी गोड करायला पाहिजे होती. पण तसं झालं नाही, असं सुद्धा पाटील म्हणाले.

ओला दुष्काळ जाहीर करा

सुरुवातीपासूनचं पिकांवर पडत असलेले वेगवेगळे रोग, सततचा पाऊस यामुळे शेतकऱ्यांच्या हातातून खरीपाचं पीक निघून गेलं आहे. आज देखील अनेक शेतकऱ्यांच्या बाधांवर गुडघाभर पाणी आहे. अशा परिस्थितीत ओला दुष्काळ जाहीर करून शेतकरी आणि विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा. अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत असताना, याबाबत शासन उदासीन आहे. त्यामुळे या सगळ्या मागण्यांसाठी मी जिल्हाधिकारी कार्यलयासमोर अमरण उपोषणाला बसलो आहे. शेतकऱ्यांना दिवाळा निघालेला असताना मी दिवाळी करणं मला योग्य वाटलं नाही, असं आमदार कैलास पाटील म्हणाले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी उद्धव ठाकरे गट आक्रमक

उद्धव ठाकरे गट सध्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. नुकतंच पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी औरंगाबाद जिल्ह्यातील दहेगाव आणि पेंढापूर या दोन गावात जाऊन शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली. त्याचबरोबर शेतकऱ्यांना धीर देत ५० हजार रुपये हेक्टर मदतीची मागणी शेतकऱ्यांची आहे, त्या मागणीला शिवसेनेचा पाठिंबा आहे, असं देखील ते म्हणाले. तर दुसरीकडे ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाही, या विधानाचं पुनरउच्चार कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी मुंबई तकशी बोलताना केला. तर लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत मिळवून देऊ, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.

    follow whatsapp