BJP | Rahul Kul News :
ADVERTISEMENT
मुंबई : दौंडचे भाजप (BJP) आमदार आणि विधानसभा हक्कभंग समितीचे अध्यक्ष अॅड. राहुल कुल (Rahul Kul) यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्यात कुल यांनी ५०० कोटींचे मनी लाँड्रिग केल्याचा आरोप शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. याबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून कुल यांची ईडी आणि सीबीआय मार्फेत चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. (Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut has alleged that Rahul Kul laundered money worth Rs 500 crore in the Bhima-Patas cooperative sugar factory.)
संजय राऊत यांनी पत्रात काय म्हटलं आहे?
भीमा सहकारी साखर कारखानाने केलेल्या प्रचंड भ्रष्टाचाराची चौकशी होण्याबाबत :
जय महाराष्ट्र!
आपल्या नेतृत्वाखालील सरकारने सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचार खणून काढण्याचे ठरवले आहे व त्याबद्दल आपले अभिनंदन. भारतीय जनता पक्षाचे काही नेते जे आपल्या अंतस्थ गोटात वावरत असतात, ते सातत्याने प्रमुख विरोधी पक्षांचे व्यवहार, त्यांचे साखर कारखाने याबाबत भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आणत आहेत व या नेत्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रांचा ससेमिरही लावला जातो. भ्रष्टाचारास धर्म व राजकीय पक्ष नसतो. त्यामुळे भ्रष्टाचाराची वाळवी नष्ट होणे गरजेचे आहे. या मताचा मी आहे.
पुणे जिल्ह्यातील तालुका दौंड येथील भीमा सहकारी साखर कारखानाने गेल्या काही वर्षात केलेल्या भ्रष्टाचार गैरव्यवहाराचे प्रकरण म्हणजे सरळ सरळ अंदाजे ५०० कोटी रुपयांचे ‘मनी लाँडरिंग’ आहे. कोल्हापुरातील आमदार हसन मुश्रीफ यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे प्रकरण सध्या चर्चेत आहे व तपास यंत्रणांच्या धाडी त्या संदर्भात पडत आहेत. पण दौंडच्या भीमा सहकारी साखर कारखान्यातील शेकडो कोटींचा गैरव्यवहार यापेक्षा भयंकर आहे व या भ्रष्टाचारास राजकीय संरक्षण मिळत असेल तर ते गंभीर आहे.
Sanjay Raut: ‘मनसेच्या वाटेला जाण्याइतकं त्यांचा पक्ष..’, खोचक प्रत्युत्तर
भाजपच्या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेचे मुख्य सुत्रधार श्री. किरीट सोमय्या यांच्या स्वतंत्र यंत्रणेमार्फत आपण भीमा सहकारी साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराची माहिती घेऊ शकता. त्यांच्या कार्यालयात हे प्रकरण संबंधित तक्रारदार घेऊन गेले आहेत. पण किरीट सोमय्या त्या भ्रष्टाचारावर मूग गिळून बसलेत. जनतेच्या पैशांची प्रचंड लुटमार या कारखान्यात झाली आहे. हे सर्व प्रकरण तत्काळ “ईडी’ व ‘सीबीआयच्या ताब्यात देऊन भीमा सहकारी साखर कारखान्यात घोटाळा करणाऱ्यांवर कारवाई करावी. या प्रकरणाचा सविस्तर तपशील सोबत जोडत आहे. कळावे,
आपला नम्र,
संजय राऊत
Sanjay Raut : प्रधान सचिवांना राऊतांचं पत्र, हक्कभंग प्रकरणावर म्हणाले…
राहुल कुल हक्कभंग समितीचे अध्यक्ष :
काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी विधिमंडळाबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरुन विधानसभेत त्यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला आहे. याच प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विधानसभेत हक्कभंग समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष राहुल कुल आहेत. याशिवाय भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमधीलही काही सदस्य या समितीवर आहेत.
ADVERTISEMENT