मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शपथ घेतल्यानंतर दोन दिवसांचे विशेष अधिवेशन पार पडले. यामध्ये भाजपच्या राहुल नार्वेकरांना (Rahul Narvekar) विधानसभा अध्यक्ष करण्यात आले आहे. दुसऱ्या दिवशी सरकारने विश्वासमताचा ठराव देखील जिंकला. अनेक दिवसांपासून आपल्या मतदार संघापासून दूर असलेले बंडखोर आमदार आपल्या मतदार संघात पोहोचले. शिवसेना बंडखोर आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनीही संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
ADVERTISEMENT
तिथे जाताच त्यांनी पत्रकार परिषद घेतली. एकनाथ शिंदे यांना शिवसेना (Shivsena) विधिमंडळ पक्षाच्या गटनेता म्हणून पुन्हा मान्यता मिळाली आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष हा आमचाच आहे, आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा शिवसेना बंडखोर आमदार करत आहेत. संजय गायकवाड यांनीही टीका केली आहे.
अशातच शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी पक्ष नेतृत्वावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यातील सत्तापालट झाल्यानंतर पहिल्यांदाच गायकवाड बुलढाण्याला गेले आहेत. तिथे गेल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर आम्हालाही आनंद झाला होता.
परंतु नंतर काँग्रेस-राष्ट्रवादीने आम्हाला निधी दिला आहे. आमच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांकडे केल्या, त्यामुळे फुटलेले सर्व आमदार व्यथित होते. म्हणूनच आम्हाला असा निर्णय घ्यावा लागला असे संजय गायकवाड म्हणाले.
पुढे बोलताना संजय गायकवाडांनी शिवसेना नेते संजय राऊतांवर प्रखर शब्दात टिका केली आहे. संजय राऊत हे राष्ट्रवादीची सुपारी घेऊन शिवसेना संपवायला निघाले होते, त्यामुळे आम्ही सर्वजण व्यतिथ झालो होतो. उद्धव ठाकरे हे देव माणूस आहेत, आजही प्रत्येक आमदाराला त्यांच्या बद्दल आदर आहे.
परंतु त्यांच्याभोवती काँग्रेस-राष्ट्रवादी असल्याने त्यांना काही सुचू देत नव्हते. त्यामुळे सरकारमध्ये असूनही शिवसेनेला मोठा संघर्ष करावा लागत होता असे संजय गायकवाड म्हणाले. यावेळी त्यांनी शिवसेना हे चिन्ह आम्हालाच मिळणार आहे, येत्या दोन महिन्यात सर्व चित्र स्पष्ट होईल असेही गायकवाड म्हणाले.
ADVERTISEMENT