हिंगोली : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर हिंगोली जिल्ह्यात विस्कळीत झालेली शिवसेना सावरण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहेत. खासदार हेमंत पाटील यांना टक्कर देण्यासाठी ठाकरे यांनी यापूर्वी हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांना पक्षात घेतले आहे. त्यानंतर कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांना आस्मान दाखविण्यासाठी संतोष टारफे आणि अजित मगर या बांगर यांच्यां दोन प्रतिस्पर्ध्यांना पक्षात घेतले आहे. याशिवाय ठाकरे यांनी दोन नवीन जिल्हाध्यक्षांचीही नियुक्ती केली आहे.
ADVERTISEMENT
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी छावा दलाचे विनायक भिसे आणि संदेश देशमुख या दोघांची जिल्हाध्यक्ष या पदावर नियुक्ती केली आहे. या दोघांनी आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून हिंगोली शहरात फटाक्यांची आतिषबाजी करत भव्य मोटारसायकल रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले. यावेळी विनायक भिसे यांनी आमदार संतोष बांगर आणि खासदार हेमंत पाटील यांना येत्या निवडणुकीत विधानसभेची पायरी चढू देणार नाही, त्यांना पुन्हा गुलाल लागू देणार नाही अशी शपथ घेतली.
जयंत पाटलांसमोरच अमोल मिटकरींची नाचक्की : थेट जिल्हाध्याकडून कमिशनखोरीचा आरोप
काय म्हणाले विनायक भिसे?
‘मुंबई तक’शी बोलताना विनायक भिसे म्हणाले, हिंगोली जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती, नगरपालिका आणि जिल्हा परिषद शिवसेनेच्या ताब्यात आणण्यासाठी आम्हाला आहोरात्र झटावे लागणार आहे. पण शिवसेनेचा झेंडा फडकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. संतोष बांगर यांच्या आव्हानाविषयी बोलताना भिसे म्हणाले, बांगर यांचे आव्हान, ताकद हे काहीच नाही. किरकोळ आणि चिल्लर माणूस आहे. त्याची दहशत आम्ही मोडून काढतो. उलटं त्यालाच आमचे आव्हान कालही होते आणि आजही आहे.
राज ठाकरेंची मनसे आणि भाजप यांची युती शक्य आहे? समीकरण जुळल्यास कुणाचा कसा फायदा?
संतोष टारफे आणि अजित मगर शिवसेनेत :
कळमनुरीचे माजी आमदार संतोष टारफे आणि शेतकरी नेते अजित मगर यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला आहे. दोघांनीही ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे बांगर यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. 2019 मध्ये संतोष बांगर यांच्याविरोधात संतोष टारफे आणि अजित मगर यांनी निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत टारफेंचा पराभव झाला होता तर मगर यांनी जवळपास ६७ हजार मत घेवून बांगर यांच्यापुढे कडवे आव्हान उभे केले होते.
ADVERTISEMENT