मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना वाशी टोलनाका तोडफोडप्रकरणी वाशी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आज राज ठाकरे वाशी न्यायालयात पोहचले तेव्हा त्यांच्यासोबत अमित ठाकरेही होते. वाशी न्यायालय परिसरात मनसैनिकांची मोठी गर्दी होती. राज ठाकरे कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानाहून सकाळी 11 वाजता निघाले होते. वाशी न्यायालयात वकिलांची मोठी फौज हजर होती. राज ठाकरेंच्या स्वागतासाठी मनसैनिकांनी टोलनाक्यावरच पोस्टरबाजी केली.
ADVERTISEMENT
15 हजारांच्या जातमुचलक्यावर राज ठाकरे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. वाशी न्यायालयात आज ऱाज ठाकरे हजर झाले होते. या प्रकरणी पुढील सुनावणी 5 मे रोजी होणार आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना जानेवारी महिन्यात वॉरंट बजावण्यात आलं होतं. त्यानंतर मनसेचं विधी व न्याय विभागातील वकिलांची फौजच न्यायालयात हजर होती. राज ठाकरेंना जामीन मंजूर होईल असा विश्वास वकील रविंद्र पाष्टे यांनी आधीच व्यक्त केला होता. 26 जानेवारी 201 ला राज ठाकरेंनी प्रक्षोभक केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्या भाषणानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी वाशी टोलनाक्यावर तोडफोड करण्यात केली होती. या प्रकरणी राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासंदर्भात वाशी न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान राज ठाकरेंना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
26 जानेवारी 2014 रोजी वाशीतील विष्णुदास भावे या नाट्यगृहात मनसेचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील टोलनाक्याबाबत प्रश्न उपस्थित होते. टोलनाक्यांवरुन सर्वसामान्य जनतेच्या पैशावर दरोडा टाकला जात असून यांना अद्दल घडवा असं वक्तव्य केले होते. राज ठाकरे यांच्या भाषणानंतर पुढील काही वेळातच वाशी खाडी पुलावरील टोलनाक्यावर नवी मुंबईतील मनसेने कार्यकर्त्यांनी जोरदार तोडफोड केली होती. या प्रकरणी राज ठाकरे, नवी मुंबई मनसे अध्यक्ष गजानन काळेंसह एकूण सात जणांवर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ADVERTISEMENT