Raj Thackeray वारंवार करत असलेली सूचना उद्धव ठाकरेंकडून मान्य, दिले महत्वाचे निर्देश

मुंबई तक

• 07:25 AM • 14 Sep 2021

साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माता भगिनींची टिंगल-टवाळी खपवून घेतली जाणार नाही आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून ही शिकवण घेतली आहे असं म्हणत कठोर उपाय योजना करण्याचे निर्देश दिले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे वारंवार आपल्या भाषणांमधून परप्रांतीयांचा मुद्दा उपस्थित करत असतात. परप्रांतीयांची नोंद ठेवली गेली पाहिजे कोण राज्यात येतं कोण नाही हे […]

Mumbaitak
follow google news

साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माता भगिनींची टिंगल-टवाळी खपवून घेतली जाणार नाही आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून ही शिकवण घेतली आहे असं म्हणत कठोर उपाय योजना करण्याचे निर्देश दिले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे वारंवार आपल्या भाषणांमधून परप्रांतीयांचा मुद्दा उपस्थित करत असतात.

हे वाचलं का?

परप्रांतीयांची नोंद ठेवली गेली पाहिजे कोण राज्यात येतं कोण नाही हे ठाऊक असलं पाहिजे असं त्यांनी वारंवार सुचवलं आहे हा राज ठाकरेंचा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्य केला आहे. त्यासंदर्भातले निर्देशच उद्धव ठाकरे यांनी आता दिले आहेत.

महिला सुरक्षित राहिल्याच पाहिजेत, यासाठी जे काही करता येईल, अशा उपाययोजनांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, त्यासाठी पूर्ण पाठबळ देण्यात येईल. यातून महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना वचक बसावा यासाठी जो काही संदेश द्यावा लागेल, त्यासाठी प्रयत्न करा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारच्या बैठकीत सांगितले. पोलिस महिलांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करतीलच, पण निराधार, असहाय महिलांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी धोरण म्हणून राज्य आणि केंद्र सरकारने संयुक्तपणे प्रयत्न करावे लागतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

‘कुणीतरी वाईटपणा घ्यावाच लागतो…’ Dahihandi उत्सवावरून CM उद्धव ठाकरेंचं राज ठाकरेंना उत्तर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश…

गुन्ह्यात रिक्षांचा वापर झाल्याचे निरिक्षण नोंदवण्यात आले. त्यावर रिक्षांच्या अनधिकृत हस्तांतरणाला पायबंद घालण्यात यावा. त्याबाबत नोंदणी करतानाच, स्थानिक पोलिसांकडे माहिती देण्याचे संबंधित परवानाधारकाला बंधनकारक करावे.

इतर राज्यातून येणाऱ्यांची नोंद ठेवावी लागेल. ते येतात कुठून जातात कुठे यांची माहिती ठेवावी लागेल.

जलदगती न्यायालयांतून निकाल लागतो. पण शिक्षेच्या अमंलबजावणीबाबत आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियेबाबत सुधारणा करण्याचे प्रयत्न व्हावेत.

निती आयोगाच्या मंगळवारी होणाऱ्या बैठकीत जलदगती न्यायालयांच्या कार्यप्रणालीत धोरणात्मक सुधारणा करण्याची सूचना करण्यात यावी.

शक्ती कायद्यातही या अनुषंगाने सुधारणा करण्यावर भर दिला जाईल.

महिला पोलीसांनी पीडित महिलांशी संवाद साधून, विश्वासाने बोलून माहिती घ्यावी. त्यांच्या छोट्या तक्रारींकडेही दुर्लक्ष होऊ नये.

Mumbai Sakinaka Case : साकीनाका प्रकरणानंतर ठाकरे सरकार कोणता कायदा आणतंय? समजून घ्या

काय म्हणाले दिलीप वळसे पाटील?

गृहमंत्री वळसे- पाटील म्हणाले की, अलीकडच्या काळात राज्यात घडलेल्या घटनामुळे पोलिसांचा वचक आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे. ही बाब पोलीस दलाने गांभीर्याने घेण्याची गरज आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. यासाठी पोलीस दलाने अधिक दक्ष व सतर्क राहणे आवश्यक आहे. कोरोना काळात पोलीस यंत्रणावर विशेष ताण आहे हे लक्षात घेतले तरी यंत्रणानीं अधिक सतर्क व कार्य तत्पर रहावे. पोलीस स्थानकात आलेल्या महिलेची तक्रार तातडीने नोंदवून घेण्यात यावी. या तक्रारीचा तपास, पुरावे जमा करण्यास प्राधान्य द्यावे. अत्याचाराच्या गंभीर प्रकरणात दोषारोपपत्र लवकरात लवकर दाखल करावे. अशा न्यायालयीन प्रकऱणांना गती देण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करावा. महाराष्ट्र पोलीस दल नावारुपाला आलेले दल आहे. हे नाव राखण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे, असेही त्यांनी सांगितले.

    follow whatsapp