शिवसेनेसोबतची युती तुटल्यानंतर राज्यात सध्या भाजप आणि मनसे एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्यात आज सकाळी नाशिकमध्ये भेट झाली. १० ते १५ मिनीटं ही भेट झाल्याचं कळतंय. हे दोन्ही नेते गेल्या ३ दिवसांपासून नाशिकमध्ये आहेत. दोन्ही नेत्यांचा मुक्काम हा शासकीय निवासस्थानात आहे.
ADVERTISEMENT
या चर्चेचा तपशील अद्याप समजू शकलेला नसला तरीही काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरेंसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे भाजप आणि मनसे एकत्र येणार का अशा चर्चांना उधाण आलं होतं. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही या विषयावर योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असं म्हणत सूचक संकेत दिले होते. नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता आहे. परंतू सध्याच्या महाविकास आघाडी सरकारमुळे भाजपला आगामी निवडणुकीत इथे मोठं आव्हान मिळू शकतं.
BJP-MNS एकत्र येणार? देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात दिलं उत्तर, म्हणाले…
मनसेनेही २०१२ ते २०१७ या काळात नाशिक महापालिकेवर मनसेची सत्ता होती. परंतू यानंतर मनसेची शहरात घसरण होऊन सध्या त्यांचे ५ नगरसेवक निवडून आले आहेत. अशा परिस्थितीत भाजपच्या सहाय्याने आगामी महापालिकेत मनसे स्वतःला मजबूत करण्याचा प्रयत्न करेल असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्या भेटीनंतर राज्यात नवीन समीकरणं दिसणार का अशी चर्चा सध्या सर्वत्र रंगताना दिसत आहे.
ADVERTISEMENT