‘मोदीजी आमचं सरकार तुमच्याच आशीर्वादाने बनलंय’, CM शिंदे काय बोलून गेले?

मुंबई तक

10 Feb 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:04 AM)

CM Eknath Shinde has made a statement on government formation: मुंबई: मुंबईतून (Mumbai) आज एकाच वेळी दोन वंदे भारत (Vande Bharat) ट्रेनचं लोकार्पण झालं. स्वत: पंतप्रधान मोदींनी (PM Modi) या विशेष ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. पण याच कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी जे भाष्य केलं त्याने सगळ्यांचा भुवया उंचावल्या आहेत. वंदे […]

Mumbaitak
follow google news

CM Eknath Shinde has made a statement on government formation: मुंबई: मुंबईतून (Mumbai) आज एकाच वेळी दोन वंदे भारत (Vande Bharat) ट्रेनचं लोकार्पण झालं. स्वत: पंतप्रधान मोदींनी (PM Modi) या विशेष ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. पण याच कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी जे भाष्य केलं त्याने सगळ्यांचा भुवया उंचावल्या आहेत. वंदे भारत ट्रेनचं लोकार्पण कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री शिंदेंनी काही महिन्यांपूर्वी बनलेलं राज्यातील सरकार हे पंतप्रधान मोदींच्या आशीर्वादानेच बनलं असल्याचं म्हटलं आहे. ( modiji our government has been formed with your blessings what did cm shinde say actually)

हे वाचलं का?

‘आमचं 5-6 महिन्यांचं सरकार हे आपल्याच आशीर्वादाने बनलं आहे.’ असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. त्यामुळे आता आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं होतं तेव्हा भाजपचे अनेक नेते म्हणत होते की, त्यांचा या बंडाशी काहीही घेणं देणं नाही. पण आता स्वत: एकनाथ शिंदे म्हणत आहेत की, पंतप्रधान मोदींच्या आशीर्वादानेच हे सरकार आलं आहे.

PM Modi: बाळासाहेबांच्या आवडीचा चाफा हार CM शिंदेंनी घातला PM मोदींना!

पाहा वंदे भारत ट्रेन लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री काय-काय म्हणाले:

मुख्यमंत्री शिंदेंकडून PM मोदींचं प्रचंड कौतुक

‘मला आनंद या गोष्टीचा आहे की, या दोन्ही ट्रेनच्या लोकार्पण सोहळ्याला स्वत: भारताचे पंतप्रधान हे उपस्थित आहेत. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. पंतप्रधानजी मी तुमचं स्वागतही करू इच्छितो.. मागील आठवड्यात जो ग्लोबल सर्व्हे झाला त्यात देशातच नव्हे तर जगात आपले पंतप्रधान एक नंबरवर आहेत. आमच्या सर्व देशवासियांसाठी खूपच गर्व आणि अभिमानाची बाब आहे.’

‘आज दोन वंदे भारत ट्रेन येथून सुटणार आहे. ही महाराष्ट्रासाठी चांगली गोष्ट आहे. जसं रेल्वे मंत्री म्हणाले की, रेल्वेचं नेटवर्क हे महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. जो रेल्वे विभाग होता तो मागील काही वर्षांपासून दुर्लक्षित होता. पण आपल्या कार्यकाळात त्यात अनेक नवनव्या गोष्टी आणल्या जात आहेत.’

‘काही जणं म्हणतात महाराष्ट्राला काय मिळालं? पण त्यांनी बजेट नीट वाचलं नाही. महाराष्ट्राला कधीही 13500 कोटी रुपये रेल्वेला मिळाले नव्हते. हे पहिल्यांदा घडलं आहे. कारण सर्वसामान्य लोकं यातून प्रवास करतात. याच विभागाला सक्षम करण्याचा विडा उचलाला आहे.’ असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

‘लक्झमबर्गचे पंतप्रधान मोदी भक्त’; शिंदेंचा किस्सा, मोदींनाही हसू अनावर

‘आमचं सरकार तुमच्या आशीर्वादाने बनलं’

‘मुंबईचे अनेक प्रकल्प आहेत ज्याला तुम्ही सहयोग करत आहेत. महाराष्ट्रासाठी कृषी, इन्फ्रास्ट्रक्चर सर्व सेक्टर आहेत यामध्ये केंद्र सरकारचा संपूर्ण सहयोग आहे. आतापर्यंतच्या इतिहासात कधीही एवढे नॅशनल हायवे बनले नव्हते.’

‘मात्र, सात-आठ वर्षात अनेक हायवे देशभरात आणि महाराष्ट्रात होत आहेत. हे केंद्र सरकारच्या सहकार्याने होत आहे. त्यासाठी मी राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या नात्याने तुमचे आभार मानतो.’

CM शिंदेंनी पंतप्रधान मोदींना भेट दिलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीचा दोन महिन्यात लिलाव

‘आमचं 5-6 महिन्यांचं सरकार हे आपल्याच आशीर्वादाने बनलं आहे. हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे. लोकांच्या मनातील सरकार आणि त्यांच्यासाठीच काम करणारं सरकार आहे. याच सरकारमध्ये आपण हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी हायवेचं उद्घाटन केलं. आता लाखो लोक त्याचा फायदा घेत आहेत. मुंबईत मेट्रोचा शुभारंभ झाला. त्याचाही अनेक लोकं फायदा घेत आहेत.’ असंही शिंदे म्हणाले.

‘यापुढेही अनेक प्रकल्प आहेत. अनेक प्रकल्प आपली वाट पाहत आहेत. आम्ही आपल्याला पुन्हा बोलावू.. विनंती करू. आपण आम्हाला सहयोग द्या.’

‘या बजेटमध्ये महाराष्ट्राला बराच फायदा झाला आहे आणि पुढेही असाच आपण सहयोग करा. आम्ही खूप मेहनतीने काम करू. आपलं जे या देशाबाबत स्वप्न आहे की, पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं. त्यात महाराष्ट्राचंही 1 ट्रिलियन डॉलरचं टार्गेट आहे. ज्याचा देशाच्या आर्थिक वाटचालीस हातभार लावेल.’ असंही मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले.

    follow whatsapp