Mumbai Crime News : मुंबईतील वडाळा परिसरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी त्याच मुलीच्या बापाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) आणि POCSO (प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना वडाळा परिसरात घडली. आरोपी आपल्या मुलीसोबत झोपताना अश्लील कृत्य करायचा. ही माहिती तिने एका पुजाऱ्याला सांगितल्यावर घटना उघडकीस आली. पीडितेने सांगितलं की, रात्री तिचे वडील तिच्या कपड्यांमध्ये हात घालून अश्लील कृत्य करायचा. ही घटना अनेकवेळा घडल्यानं ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाली होती. तिने तिची आपबीती तिच्या मैत्रिणीला सांगितली. तिच्या मैत्रिणीनं तिचं सांत्वन केलं आणि तिला ओळखीच्या पुजाऱ्याकडे जाण्याचे सुचवलं.
हे ही वाचा >> राजन साळवींचा उद्धव ठाकरेंकडून पाणउतारा, 'मातोश्री'मधील प्रचंड खळबळजनक Inside स्टोरी
पीडितेने आणि तिच्या मैत्रिणीने संपूर्ण घटना पुजाऱ्याला सांगितला. पुजाऱ्यानं तात्काळ याप्रकरणी पुढाकार घेत त्यांना स्थानिक पोलिस ठाण्यात नेले आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. पोलीस तपासात आरोपीचे दोन लग्न झाल्याचंही समोर आलं आहे. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्यानं दुसरं लग्न केलं, परंतु दारूचं व्यसन आणि घरगुती वादामुळे त्याची दुसरी पत्नी त्याला सोडून गेली.
हे ही वाचा >> 'धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरू देणार नाही, ह%#$@ औलादीचं...', जरांगे आक्रमक
आरोपी पहिल्या पत्नीपासून जन्मलेल्या तीन मुलांसह राहत होता. एक मुलगी आणि दोन मुलांचा समावेश असं ते कुटुंब होतं. पीडितेच्या जबाब आणि प्राथमिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत असून, कुटुंबातील इतर सदस्यांचीही चौकशी करत आहेत.
ADVERTISEMENT
