महाराष्ट्रात दिवसभरात 29 हजार 270 कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत राज्यात 54 लाख 60 हजार 589 कोरोना रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे राज्याचे रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 94.54 टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्रात दिवसभरात 15 हजार 169 नवे कोरोना रूग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात 285 रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात आत्तापर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 55 लाख 14 हजार 594 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 57 लाख 76 हजार 184 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज घडीला महाराष्ट्रात 16 लाख 87 हजार 643 लोक होम क्वारंटाईन आहेत. तर 7 हजार 418 लोक संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. आज घडीला राज्यात 2 लाख 16 हजार 16 सक्रिय रूग्ण आहेत. महाराष्ट्रात दिवसभरात 15 हजार 169 नवे रूग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण रूग्णांची संख्या 57 लाख 76 हजार 184 इतकी झाली आहे.
आज नोंद झालेल्या एकूण 285 मृत्यूंपैकी 211 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 74 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या 268 ने वाढली आहे. हे 268 मृत्यू, पुणे-60, नागपूर-45, अहमदनगर-25, औरंगाबाद-24, गडचिरोली-21, भंडारा-14, नांदेड-11, नाशिक-9, रत्नागिरी-7, गोंदिया-6, लातूर-5, ठाणे-5, कोल्हापूर-4, उस्मानाबाद-4, सांगली-4, वर्धा-4, बीड-3, पालघर-3, सातारा-3, सोलापूर-2, यवतमाळ-2, बुलढाणा-1, चंद्रपूर-1, धुळे-1, जळगाव-1, जालना-1, परभणी-1 आणि रायगड-1 असे आहेत.
ADVERTISEMENT