महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने २०२०मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. पूर्व परीक्षेतून 3 हजार 214 उमेदवारांची मुख्य परीक्षेसाठी निवड करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. आयोगाने मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. यात ३ हजार २१४ उमेदवारांची मुख्य परीक्षेसाठी निवड झाली आहे.
मुख्य परीक्षेची अधिसूचना स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आयोगाने दिली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यसेवा पूर्व परीक्षा-२०२० लांबणीवर पडली होती. परीक्षेची तारीख लांबत असल्याने उमेदवारांकडून विविध मार्गांनी सरकारचं याकडे लक्ष वेधण्यात आलं होतं.
विद्यार्थ्यांकडून सातत्याने मागणी करण्यात आल्यानंतर २१ मार्चला राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्यात आली होती. पूर्व परीक्षा पार पडल्यानंतर निकाल कधी जाहीर होणार याकडे उमेदवारांचं लक्ष होतं. अखेर निकाल जाहीर करण्यात आला आहे.
संपूर्ण उमेदवारांची यादी…
पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेसाठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी आयोगाने संकेतस्थळावर जाहीर केली आहे. त्यात पुणे विभागातून सर्वाधिक १ हजार ७२ उमेदवारांची निवड झाली आहे. तर त्यानंतर औरंगाबाद येथील २४१, नाशिक येथील २२०, कोल्हापूर येथील १६९, अहमदनगर येथील १७७ उमेदवारांची निवड झाली आहे.
कोरोनामुळे परीक्षेला विलंब… विद्यार्थ्यांची आंदोलन
राज्यात कोरोनाच्या लाटेन शैक्षणिक क्षेत्राचं वेळापत्रकच कोलमडलं. याचा फटका स्पर्धा परीक्षांनाही बसला. राज्यसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा कोरोना प्रार्दुभाव वाढल्याने अनेक वेळा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता होती. याचे पडसादही उमटले होते. राज्यभरात विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यानंतर आयोगाकडून परीक्षा घेण्यात आली.
नियुक्त्यांचा प्रश्नही आला होता ऐरणीवर
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीकडून घेण्यात आलेल्या परीक्षा आणि मुलाखतीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या नियुक्त्यांचा प्रश्नही ऐरणीवर आला होता. पुण्यात एका उमेदवारांना आत्महत्या केल्यानंतर याचे पडसाद राज्यभर उमटले होते. त्यानंतर सरकार आणि आयोगाकडून नियुक्त्यांसंदर्भातील कारवाई सुरू करण्यात आली.
ADVERTISEMENT