ADVERTISEMENT
मुंबईतील काळबादेवी परिसरातील लोहार चाळीत भयंकर आग लागल्याची दुर्घटना घडली.
याठिकाणी पहाटे ३.४५ च्या सुमारास रहिवाशांना घराबाहेर पडण्यास भाग पडलं.
लोहार चाळ येथील श्रीजी भवन येथे आग लागल्यामुळे मोठी वित्तहानी झाली आहे.
जवानांनी वेळीच बचाव कार्य हाती घेत घरं रिकामी केली असून, 122 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं.
या आगीत इमारतीतील 8 दुकानं आणि 7 गाळे जळून कोळसा झाले आहेत.
चार वेगवेगळ्या भागातील अग्निशमन दलांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचं काम केलं.
उशिराने आग नियंत्रणात आली. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
ADVERTISEMENT