Mumbai Crime : ५० लाखांच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचं अपहरण, तीन आरोपींना अटक

मुंबई तक

• 01:12 PM • 02 Feb 2022

मुंबईतल्या समता नगर पोलिसांनी ५० लाखांच्या खंडणीसाठी एका व्यापाऱ्याचं अपहरण करणाऱ्या तिघा आरोपींना अटक केली आहे. ड्राय फ्रूट व्यापाऱ्यातं तिन्ही आरोपींनी मुंबईच्या खेरवाडी भागातून अपहरण केलं होतं. अपहरण केल्यानंतर या व्यापाऱ्याला त्यांनी कांदिवली ठाकूर व्हिलेज भागात लपवलं होतं. खंडणीची रक्कम दिली नाही तर जिवे मारण्याची धमकीही या आरोपींनी दिली होती. परंतू समता नगर पोलिसांनी अवघ्या […]

Mumbaitak
follow google news

मुंबईतल्या समता नगर पोलिसांनी ५० लाखांच्या खंडणीसाठी एका व्यापाऱ्याचं अपहरण करणाऱ्या तिघा आरोपींना अटक केली आहे. ड्राय फ्रूट व्यापाऱ्यातं तिन्ही आरोपींनी मुंबईच्या खेरवाडी भागातून अपहरण केलं होतं. अपहरण केल्यानंतर या व्यापाऱ्याला त्यांनी कांदिवली ठाकूर व्हिलेज भागात लपवलं होतं. खंडणीची रक्कम दिली नाही तर जिवे मारण्याची धमकीही या आरोपींनी दिली होती. परंतू समता नगर पोलिसांनी अवघ्या १० तासांत सूत्र हलवत बोरिवली भागातून या आरोपींना अटक केली आहे. या घटनेत अपहरण केलेल्या व्यापाऱ्याला सुखरुप वाचवण्यात पोलिसांना यश आलं आहे.

हे वाचलं का?

२६ जानेवारीच्या दिवशी व्यापारी धवल अकबरी यांचं तीन आरोपींनी खेरवाडी भागातून अपहरण केलं. यावेळी अकबरी यांच्या गाडीच्या चालकालाही आरोपींनी कांदिवली भागात आणून ५० लाखांच्या खंडणीची मागणी केली. खंडणीची रक्कम दिली नाही तर तुला आणि ड्रायव्हरला मारुन टाकू अशीही धमकी आरोपींनी दिली. परंतू एवढी मोठी रक्कम देणं शक्य नसल्याचं व्यापाऱ्याने सांगितल्यानंतर आरोपींनी ५ लाखांची रक्कम मान्य केली.

पैशांचा बंदोबस्त करण्यासाठी आरोपींनी व्यापारी धवल अकबरी यांना ठाकूर व्हिलेज परिसरात सोडून देत त्यांच्या चालकाला आपल्याकडे ओलिस ठेवलं. व्यापाऱ्यांच्या तावडीतून सुटल्यानंतर अकबरी यांनी थेट समता नगर पोलीस स्टेशन गाठलं. यानंतर DCP सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता अकबरी यांच्या गाडीचा पत्ता पोलिसांना सापडला.

पुणे: मोबाइल नंबर न दिल्याने तरुणीवर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी

परंतू यानंतर आरोपी वारंवार आपली जागा बदलत होते. ड्रायव्हरच्या मोबाईलवरुन फोन करत आरोपींनी पैसे घेऊन एकट्यानेच शताब्दी हॉस्पिटलच्या जवळ येण्यास सांगितलं. यावेळी आरोपींना पोलीस आपल्या मागावर असल्याचं कळताच त्यांनी पुन्हा एकदा ड्रायव्हरला जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारावर बोरिवली भागातून कृष्णा बाळप्पा सैदापूर, समीर शेख आणि देवराज पवार या पंचविशीतल्या तरुणांना अटक केली.

नाशिकमध्ये पतीच्या हत्येसाठी पत्नीने दिली सुपारी, सळईने चेहरा ठेचत मृतदेह फेकला दरीत

    follow whatsapp