ADVERTISEMENT
पाऊस, मुंबईचे रस्ते आणि खड्डे हे समीकरण आता मुंबईकरांसाठी काही नवीन राहिलेलं नाही.
प्रत्येक वर्षी मुंबईच्या रस्त्यात पावसामुळे खड्ड्यांची अक्षरशः चाळण झालेली पहायला मिळते.
मुंबईला गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढलं. त्यामुळे पुन्हा एकदा शहरातील महत्वाच्या रस्त्यांवर खड्ड्यांच साम्राज्य पहायला मिळतं आहे.
मुंबईच्या दहीसर चेक पोस्ट, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील भाईंदर ब्रिजजवळ रस्त्यांमध्ये खड्डे प्रवाशांच्या स्वागतासाठी तयार झाले आहेत.
या खड्ड्यांचा वाहनचालकांना चांगलाच त्रास सहन करावा लागतो आहे. दुचाकीस्वार या खड्ड्यांमधून वाट काढत जाताना…
हे चित्र पाहिल्यानंतर रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न तुम्हालाही पडेल…
या रस्त्यावरुन जाताना वाहनचाकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते आहे.
खड्ड्यातून जाणं टाळायचं असेल तर मग जो काही रस्ता उरतो त्यातून चारचाकी वाहनं, दुचाकी वाहनं, मोठे ट्रक असे दाटीवाटी करुन जातात. अशामुळे अपघात होण्याचीही भीती असते.
पावसाने मुंबई महापालिकेच्या रस्त्यांच्या कामांची पोलखोल केली आहे असं म्हणायला नक्कीच वाव आहे
बेस्ट बस असो, रिक्षा असो किंवा मग बाईक प्रत्येकाला या रस्त्यांमधून सावध पद्धतीने गाडी चालवणं भाग आहे.
ज्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्यांना वाहतूक कोडींचा सामना करावा लागतो आहे.
प्रत्येक पावसाळ्यात मुंबईत रस्त्यांच्या खराब अवस्थेबद्दल चर्चा होते…सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होतात…पण परिस्थितीत सुधारणा मात्र होत नाही.
रस्त्यातले खड्डे चुकवून उरलेल्या चांगल्या भागातून गाडी काढताना एक वाहनचालक…
परंतू एका ठिकाणी रस्ते चुकवले तरीही पुढे तुमच्या स्वागतासाठी खड्डे तयार आहेतच.
त्यामुळे दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मुंबईकरांच्या नशिबी खड्ड्यातला प्रवास कायम आहे.
अशा खड्ड्यांमुळे अनेकदा रस्ते अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
देशाच्या आर्थिक राजधानीतलं रस्त्यांचं हे रुप खरंतर आपल्या सर्वांसाठी लज्जास्पद आहे
मान्सूनच्या पहिल्याच काही महिन्यांमध्ये शहरात रस्त्यांची ही चाळण झाल्यामुळे पुढे मुंबईकरांच्या नशिबी काय वाढून ठेवलंय हे देवास ठावूक…
मुंबईच्या रस्ते बांधकामाचा दर्जा सांगणारं आणखी एक बोलकं चित्र
त्यातच मेट्रो, उड्डाणपूल यासारख्या कामांमुळे शहरातील रस्त्यांची आणखीनच दुर्दशा होताना दिसते आहे. छोट्या-मोठ्या गाड्या, अवजड वाहनं एकाच रस्त्यावरून जात असल्यामुळे रस्ता पूर्णपणे खराब होऊन जातो.
अनेक ठिकाणी रस्त्यांचं बांधकाम सुरु असताना अपघात टाळले जावेत यासाठी योग्य ती खबरदारी घेतलेली पहायला मिळत नाहीये.
त्यामुळे नेहमीप्रमाणे यंदाच्या वर्षातही पावसामुळे मुंबई खड्ड्यात गेली असंच चित्र सर्वत्र दिसतंय.
ADVERTISEMENT