Nanded honour killing : पोटच्या लेकीचा गळा घोटण्याआधी प्यायले दारू, कारण…

मुंबई तक

28 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 08:33 AM)

Nanded owner killing। shubhangi jogdand nanded : 23 वर्षांच्या शुभांगीला इतकी भयंकर शिक्षा मिळाली की ऐकणाऱ्यांच्या काळजाचं पाणी पाणी झालं. डॉक्टर होण्याचं स्वप्न उराशी असलेल्या शुभांगी जोगदंडचा कथित सामाजिक प्रतिष्ठेपायी तिच्या कुटुंबियांनी गळा घोटला. या प्रकरणात नवीन माहिती समोर आलीये. (Nanded honour killing : medical student murder by father and brother) शुभांगी नांदेडच्या आयुर्वेद महाविद्यालयात […]

Mumbaitak
follow google news

Nanded owner killing। shubhangi jogdand nanded : 23 वर्षांच्या शुभांगीला इतकी भयंकर शिक्षा मिळाली की ऐकणाऱ्यांच्या काळजाचं पाणी पाणी झालं. डॉक्टर होण्याचं स्वप्न उराशी असलेल्या शुभांगी जोगदंडचा कथित सामाजिक प्रतिष्ठेपायी तिच्या कुटुंबियांनी गळा घोटला. या प्रकरणात नवीन माहिती समोर आलीये. (Nanded honour killing : medical student murder by father and brother)

हे वाचलं का?

शुभांगी नांदेडच्या आयुर्वेद महाविद्यालयात बीएएमएसच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. हे शिक्षण घेत असताना तिचं गावातील एका तरुणाशी प्रेम जुळलं, पण या नात्याला घरच्यांचा विरोध होता. घरच्यांनी आधी शुभांगीची समजूत काढली, पण शुभांगी ऐकण्याच्या मनस्थिती नव्हती.

शुभांगीने गावातील तरुणाचा विषय सोडून द्यावा म्हणून घरच्यांनी तिचं लग्न दुसऱ्या नात्यातीलच एका मुलाशी ठरवलं. एका महिन्यापूर्वी शुभांगीचा दुसऱ्या मुलासोबत साखरपुडाही झाला, पण शुभांगीने वारंवार हे लग्न मोडण्याचा प्रयत्न केला आणि झालंही तसंच…

लग्न मोडलं अन् शुभांगीच्या कुटुंबियांच्या मनात समाजात बदनामी झाल्या कथित गोष्टीने घर केलं. शुभांगीच्या घरच्यांना राग आला. लग्न मोडल्यामुळे गावात बदनामी झाली, असं शुभांगीच्या घरच्यांना वाटू लागलं. याच बदनामीच्या रागातून शुभांगीच्या घरच्यांनी टोकाचं पाऊल उचललं.

ज्यांनी शुभांगीला तडफडून मारलं ते दुसरे तिसरे कुणी नव्हते तर ते होते शुभांगीचे वडील जनार्धन जोगदंड, तिचा भाऊ कृष्णा जोगदंड, चुलत भाऊ गिरीधारी जोगदंड, गोविंद जोगदंड आणि मामा केशव कदम….

नांदेड ऑनर किलिंग : रात्रभर जळत होतं शुभांगीचं प्रेत

दिवस होता 22 जानेवारी 2023 चा… याचदिवशी शुभांगीला संपवायचं असं घरच्यांनी ठरवलं. शुभांगीची हत्या करताना हात थरथरू नये म्हणून त्यांनी आधी दारू पिली. नंतर रुमालाने शुभांगीचा गळा आवळला.

गुदमरून निष्प्राण झालेल्या शुभांगीच्या मृतदेहाची रात्रीतूनच विल्हेवाट लावण्यात आली. रात्री हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह स्वतःच्याच ज्वारीच्या शेतात नेऊन जाळला. रात्रभर शुभांगीचं प्रेत जळत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी घरच्यांनी लवकर जाऊन शुभांगीच्या मृतदेहाची राख आणि अस्थी जवळच्या नाल्यात विसर्जित केली.

प्रेत जाळलेल्या ठिकाणी कोणताही पुरावा राहु नये म्हणून त्या जागेवर नांगर फिरवला. नांगरणीनंतरही राख दिसू नये म्हणून ज्वारीच्या शेतात पाणी सोडलं आणि शुभांगीच्या हत्येपासून राख विसर्जित करेपर्यंतचे सगळे पुरावे घरच्यांनी समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

शुभांगी कुठेय? शेजाऱ्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली अन् बिंग फुटलं

शुभांगीची हत्या केली. तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. पण दररोज दिसणारी शुभांगी अचानक दिसेनाशी झाल्यानं आजूबाजूच्यांना प्रश्न पडला. शुभांगीबद्दल काहीही कळत नसल्यानं एका शेजाऱ्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यातल्याच एका खबऱ्याने लिंबगाव पोलिसांना फोन लावला.

पोलिसांनी स्वत:हून पुढाकार घेत तपास सुरु केला आणि कथित सामाजिक प्रतिष्ठेपायी शुभांगीच्या कुटुबियांनी केलेल्या क्रूर कृत्याचं बिंग फुटलं. पोलिसांनी चौकशी केली.

आरोपींना ताब्यात घेत पोलिसांनी चौकशी केली. सुरुवातीला शुभांगीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला, असा बनाव आरोपींनी रचला. पण, पोलिसांनी खाक्या दम दाखवताच आरोपी सुतासारखे सरळ झाले आणि केलेल्या नृशंस कृत्याची कबुली दिली.

    follow whatsapp