शरद पवार यांना सोनिया गांधींनी पक्षातून हाकलून दिलं. त्यानंतर नाक घासत पुन्हा सोनिया गांधींकडे गेले. अशी लाचारी आमच्याकडे नाही असं उद्धव ठाकरे निवडणुकीच्या आधी म्हणाले होते. आता मात्र बारामतीत जाऊन त्यांचं गुणगान करत आहेत. विकासाच्या गप्पा मारू नये. लायकी नसताना मुख्यमंत्रीपदावर कायम ठेवलं आहे त्याबदल्यात हे कौतुक केलं जातं आहे असं म्हणत आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जोरदार टीका केली आहे.
ADVERTISEMENT
पुढच्या लोकसभेला यांचे किती आठही खासदार येत नाहीत. आमदार 25 पेक्षा जास्त येणार नाहीत. त्यामुळे लुटायचं तेवढं लुटून घ्या हे आता तीन पक्षांचं धोरण आहे असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात जे 56 आमदार आले आहेत ते मोदींची कृपा आहे. अन्यथा ८ आमदारांपेक्षा जास्त आले असते. शिवसेनेने गद्दारी केली, मुख्यमंत्रीपद मिळवलं अशी टीका नारायण राणे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली. मोहन डेलकराच्या पत्नीने जी निवडणूक लढवली तेव्हा त्यांची निशाणी धनुष्यबाण नव्हते. एक खासदार निवडून आल्यावर संजय राऊत लेख लिहितात, धडक मारल्याची भाषा करत आहेत. भाजपचे ३०३ खासदार आहेत याचा बहुदा त्यांना विसर पडला.
शरद पवारांसारखा लाचारपणा आमच्यात नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. आता बारामतीत जाऊन त्यांचं गुणगान गात आहेत असा टोलाही नारायण राणे यांनी लगावला.
नारायण राणे यांनी यावेळी संजय राऊत यांच्यावरही टीका केली आहे. ते काय लिहितात, काय बोलतात ते त्यांचं त्यांना कळतं की नाही माहित नाही. रात्री लिहिण्याच्या गोष्टी सकाळी लिहित असल्यामुळे असं होत असेल असंही नारायण राणे म्हणाले. नवाब मलिक यांच्यावरही नारायण राणेंनी केली. तुम्ही इतरांबद्दल कशाला बोलता? तुमचं तर आता काय काय निघणार आहे ते बघा. उंबरठ्यावर आहे सगळं.. लवकरच स्फोट होणार आहे असा सूचक इशाराही नारायण राणेंनी दिला आहे. नवाब मलिकांना राष्ट्रवादी काँग्रेसने सोडून दिलं आहे. ते आत्ता बोलत आहेत पण त्यांनीही त्यांच्या काय काय गोष्टी बाहेर निघणार ते बघा.
समीर वानखेडे यांची राहणी, त्यांचं जीवनामान याबाबत नवाब मलिक यांनी टीका केली होती. त्यावर उद्देशून नारायण राणेंना प्रश्न विचारला असता तुम्ही दुसऱ्याच्या बेडरूममध्ये कशाला डोकावता ही चांगली सवय नाही असा टोला नारायण राणेंनी हसत हसत लगावला आहे.
ADVERTISEMENT