राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी रविवारी हिंगोलीमध्ये बोलताना त्यांनी केलेल्या विधानामुळे ते नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.बोलताना मिश्किलपणे ते म्हणाले, हिंगोली गरीब जिल्हा आहे. त्यांच्या या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी नाराजी व्यक्त केली आहे. झिरवाळ हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असून, दुसरीकडे ते शरद पवार यांचेही निकटवर्तीय मानले जातात. हिंगोली जिल्ह्यातील एका कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं होतं.
ADVERTISEMENT
झिरवाळ काय म्हणाले?
हे ही वाचा >> Ind vs Pak: मोठ्या-मोठ्या वल्गना करणारा पाकिस्तान भारताच्या जवळपासही नाही, आकडेच सारं काही बोलतात!
"मी मंत्री आणि पालकमंत्री म्हणून पहिल्यांदाच इथे आलो. मला वाटतं, हिंगोली एक गरीब जिल्हा आहे. मुंबईत परतल्यानंतर, मी वरिष्ठ नेत्यांना विचारेन की, एका गरीब व्यक्तीला एका गरीब जिल्ह्याची जबाबदारी का दिली?" झिरवाळ यांनी मिश्किलपणे बोलताना आपल्या खास शैलीत हे विधान केलं. यावर स्थानिकांमध्ये चांगलाच हशा पिकला, पण दुसरीकडे राज्यभर या वक्तव्याची चर्चाही झाली.
अजित पवार आणि गिरीश महाजन काय म्हणाले?
अजित पवार म्हणाले, 'जर त्यांनी असं म्हटले असेल तर ते बरोबर नाही. आमच्या दर मंगळवारी बैठका होतात. मी याबद्दल त्याच्याशी बोलेन. जर काही गैरसमज असतील तर ते दूर केले जातील. तर मंत्री गिरीश महाजन म्हणाले, 'झिरवाळ हे एक ज्येष्ठ नेते आहेत. कोणत्याही जिल्ह्याचं गरीब किंवा श्रीमंत असे वर्गीकरण करणं चुकीचं आहे. त्यांनी असं म्हणायला नको होतं.
झिरवाळ यांचं स्पष्टीकरण
हे ही वाचा >> Video: 'कॉमन मॅन'साठी DCM एकनाथ शिंदेंनी अचानक ताफा थांबवला! मुंबईच्या रस्त्यावर घडलं तरी काय?
राज्यभरात झिरवाळ यांच्या या वक्तव्याच्या बातम्या झाल्या, नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या, त्यानंतर झिरवाळ यांनी नंतर यावर स्पष्टीकरण दिलं. माझं वक्तव्य जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित मुद्द्यांवर आधारित होतं. हिंगोलीमध्ये औद्योगिक विकास, सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधांवर फार काम झालेलं नाही. माझ्या वक्तव्याकडे नकारात्माक पद्धतीनं पाहू नका. या जिल्ह्यात काहीतरी चांगलं करण्याची जबाबदारी मला देण्यात आली आहे.
दरम्यान, राज्यात पालकमंत्री पदांच्या वाटपावरून नाराजीच्या चर्चा सुरू आहे. त्यातच झिरवाळ यांच्या वक्तव्यानं चर्चा वाढली. मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले होते, की पालकमंत्री म्हणून बाहेरील व्यक्तीची नियुक्ती केल्यास स्थानिक समस्यां सोडवायला अडथळा येऊ शकतो. त्यामुळे नाराजीच्या चर्चांना उधाण आलं होतं.
ADVERTISEMENT
