NEET च्या परीक्षाही पुढे ढकलण्यात येणार आहेत अशी घोषणा आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज केली. आज दुपारीच मेडिकलच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अशात आता NEET च्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
18 एप्रिलला ही परीक्षा होणार होती. वाढत्या कोरोना संसर्गामुळे ही परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे. मेडीकलच्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा पुढे ढकलावी यासाठी मोहीम चालवली होती. नवे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे.
NEET PG 2021 ची परीक्षा ऑफलाइन मोड मध्ये होणार होती. मात्र देशात कोरोना संकट मोठं आहे त्यामुळे ही परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने NEET – 2021 परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय़ घेतला आहे. ही परीक्षा 18 एप्रिल रोजी होणार होती. परीक्षेची नवीन तारीख नंतर ठरवली जाणार आहे. मेडिकल विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. असं ट्विट केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केलं आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत (Maharashtra University of Health Sciences) येत्या 19 एप्रिलपासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा मा मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे.
या परीक्षा आता येत्या जूनमध्ये घेण्यात येणार असून परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल. अशी माहिती देखील अमित देशमुख यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन दिली आहे.
कोरोना, काळजी आणि लसीकरण तुमच्या मनातल्या प्रश्नांना डॉ. रवि गोडसेंनी दिली आहेत उत्तरं
दहावी आणि बारावीच्याही परीक्षा पुढे ढकलल्या
कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत त्यामुळे राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वी दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस आणि जून महिन्यात दहावीची परीक्षा घेण्यात येईल असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दोनच दिवसापूर्वीच जाहीर केलं होतं. मुख्यमंत्र्यांशी यासंदर्भात चर्चा करण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. राज्य बोर्डाप्रमाणेच इतर बोर्डांनीही निर्णय घ्यावा असंही आवाहन वर्षा गायकवाड यांनी केलं होतं.
ADVERTISEMENT