महाविकास आघाडी सरकारमधले मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख या दोघांनीही आता विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क हवा म्हणून नव्याने कोर्टात अर्ज केला आहे. राज्यसभेच्या वेळी या दोघांनाही कोर्टाने मतदानाचा अधिकार दिला नव्हता. त्यानंतर आता २० जून रोजी विधान परिषदेसाठी मतदान होणार आहे. या मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून दोघांनीही नव्याने अर्ज दाखल केला आहे.
ADVERTISEMENT
नवाब मलिक १० जूनला झालेल्या राज्यसभा निवडणूक प्रक्रियेत मतदान करण्याची संमती मागितली होती. मात्र पीएमएलए विशेष न्यायालयाने नवाब मलिक यांना कोणताही दिलासा दिला नाही. त्यानंतर नवाब मलिक यांच्या वकिलांनी या निकालाला आव्हान देणारी याचिका हायकोर्टात दाखल केली होती. मात्र हायकोर्टानेही त्यांना दिलासा दिला नव्हता. तसंच अनिल देशमुख यांनाही मतदानाची संमती दिली नव्हती. आता पुन्हा एकदा या दोघांनी विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज केले आहेत. यासंदर्भात न्यायालयात १५ जूनला सुनावणी होणार आहे.
दाऊदचा भाचा अलीशाह पारकरचा ‘तो जबाब’ ज्यामुळे अडकले नवाब मलिक
दुसरीकडे १०० कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री हे तुरूंगात आहेत. अनिल देशमुख हे न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी जामीन मिळावा म्हणून याचिका दाखल केली आहे. मात्र या याचिकेला सीबीआयने विरोध केला आहे. या प्रकरणी आता मंगळवारी सुनावणी होणार आहे.
RS Polls : नवाब मलिक-अनिल देशमुखांची मतदानासंदर्भातली विनंती याचिका कोर्टाने फेटाळली
१०० कोटींच्या वसुली प्रकरणात सीबीआयने ५९ पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे. सीबीआयकडून माजी गृहमंत्री अनिल देशमुख, कुंदन शिंदे, संजीव पालांडे यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणात सचिन वाझेला माफीचा साक्षीदार होण्यासाठी विशेष सीबीआय न्यायालयानेही मंजुरी दिली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं आहेत.
दुसरीकडे नवाब मलिक यांना राज्यसभा निवडणुकीच्या वेळी कोर्टाने मतदानाचा अधिकार नाकारला होता. ईडीने त्यांना मतदानासाठी संमती देऊ नये असं म्हणत त्यांच्या याचिकेवर उत्तर दाखल केलं होतं. अनिल देशमुख तसंच नवाब मलिक यांना राज्यसभेच्या वेळी निवडणूक प्रक्रियेकरिता संमती दिली नव्हती. या दोन्ही नेत्यांनी विधान परिषद निवडणुकीसाठी संमती मागितली आहे.
ADVERTISEMENT