पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक बंडू गायकवाड यांचा मुलगा समीर गायकवाडवर भाजी विक्रेत्या महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. मुंढवा पोलीस ठाण्यात याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली असून या घटनेनंतर पुण्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी समीर गायकवाड हा मुंढवा परिसरातील महिलेकडे भाजी घेण्यासाठी जात असायचा, यातून त्यांची ओळख झाली. त्याच दरम्यान साधारणपणे दीड वर्षांपूर्वी पीडित महिला घरी एकटी असताना, आरोपी समीर याने महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली. या बाबत, जर तू कोणाला याबद्दल सांगितलंस तर तुझ्या नवर्याला आणि मुलांना मारून टाकेन अशीही धमकी समीरने दिल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.
आपल्या परिवाराच्या भीतीमुळे पीडित महिलेने घडलेल्या प्रकाराबद्दल कोणालाही सांगितलं नाही. यानंतर १७ डिसेंबरला पीडित महिलेच्या घरात आरोपी समीर तिच्यावर अत्याचार करत असताना महिलेच्या पती आणि मुलाने हा प्रकार पाहिला. यावेळीही समीरने महिलेच्या पती आणि मुलाला जिवे मारण्याची धमकी दिली. यानंतर पीडित महिलेने आपल्या पतीच्या सहाय्याने समीर गायकवाडविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
खिशाला लावलेल्या बॉलपेनमुळे बिंग फुटलं, घरफोडी करणारे आरोपी पुणे पोलिसांच्या जाळ्यात
परंतू बंडू गायकवाड यांनी आपल्या मुलावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. माझ्या मुलावर करण्यात आलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही. हे सर्व आरोप राजकीय दृष्टीने प्रेरित आहेत. आम्हाला ५० लाख रुपये दिले तर आम्ही कोणालाही सांगणार नाही अशी मागणी संबंधित महिलेच्या सासूने केली होती. त्याबद्दल आम्ही पोलिसांत खंडणीची तक्रार दाखल केली आहे. आम्हाला निश्चीत न्याय मिळेल अशी माहिती बंडू गायकवाड यांनी दिली.
अमेरिकेतला जन्म, घरात श्रीमंती…तरीही मुलगा पुण्यात येऊन बनला सराईत चोर
ADVERTISEMENT