मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला शिवाजी पार्कवर केलेल्या भाषणाचे पडसाद आता राज्यभरात उमटताना दिसत आहेत. विरोधी पक्षातील भाजप नेत्यांनी राज यांचे विचार योग्य असल्याचं म्हटलं असलं तरीही महाविकास आघाडीतल्या पक्षांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. मनसेची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या नेत्या रुपाली पाटील यांनीही राज ठाकरेंच्या भाषणावर टीका केली आहे.
ADVERTISEMENT
राज ठाकरे महाराष्ट्राचे फायरब्रँड नेते आहेत, परंतू पाडव्याच्या सभेत बोलत असताना ईडी कारवाईनंतर हेच राज ठाकरे पुष्पामधल्या फ्लॉवरसारखे वाटत होते असं रुपाली पाटील म्हणाल्या.
राज ठाकरेंच्या भाषणाचं अभिनेत्री प्राजक्ता माळीकडून कौतुक, म्हणाली…
पाडव्याच्या भाषणात बोलत असताना राज ठाकरेंनी, राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतरच राज्य जाती-पातीच्या राजकारणात विखुरलं गेलं. दोन समाजात तेढ निर्माण करून शरद पवारांनी राजकीय पोळी भाजल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला होता. या आरोपाला उत्तर देताना रुपाली पाटील यांनी. “राष्ट्रवादीमध्ये कधीच जातीचं राजकारण केलं गेलं नाही. उलट आमच्या पक्षात सगळ्याच जातीचे लोक कार्यकर्त्यांपासून मंत्री पदापर्यंत आहेत. मग अशा पक्षांमध्ये जातीवाद कसा असेल?” असा प्रश्न विचारला आहे.
भाषण करुन जनतेचे प्रश्न सुटत नाहीत, टीका-नकलांशिवाय त्यांना काहीच जमलं नाही – अजित पवार
सध्या महाराष्ट्रात आणि देशात जी परिस्थिती आहे ज्यात बेरोजगारी पासून अनेक मुद्दे असताना देखील त्याच्यावरती राज ठाकरेंनी चकार शब्दही न काढता फक्त महाविकास आघाडीवर टीका केली. यावरूनच लक्षात येत आहे की भारतीय जनता पार्टी नेहमीप्रमाणे राज ठाकरे यांचा राजकारणासाठी उपयोग करून घेत असल्याचं रुपाली पाटील म्हणाल्या.
राज ठाकरेंनी आपल्या भाषणात मशिदीवरच्या भोंग्याचा मुद्दा काढल्यानंतर रुपाली पाटील यांनीही या टीकेला उत्तर दिलं. सार्वजनिक ठिकाणांवरचे सर्व भोंगे काढावे असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असतानाच दिला होता. परंतु फडणीसांनी तो राबवला नाही, तुम्ही जाणीवपूर्वक या निकालाकडे दुर्लक्ष केलं अशी टीका करत भाजपाकडे आता विकासावर बोलण्याचा एकही मुद्दा राहिला नाही. त्यामुळेच भाजप नेते आपले मुद्दे इतर नेत्यांच्या माध्यमातून वदवून घेत असल्याचं रुपाली पाटील म्हणाल्या.
ADVERTISEMENT