Terror Funding case : जमात-ए-इस्लामी अतिरेकी संघटनेशी संबंधित ५० ठिकाणांवर NIA ची छापेमारी

मुंबई तक

• 07:09 AM • 08 Aug 2021

जम्मू आणि काश्मीर मध्ये आज NIA (National Investigation Agency) ने सर्वात मोठी कारवाई केली आहे. जमात-ए-इस्लामी या बंदी घातलेल्या अतिरेकी संघटनेशी संबंधित १४ जिल्ह्यांमधल्या ५० ठिकाणी NIA ने आज छापेमारी केली. जम्मू-काश्मीर पोलीस, सीआरपीएफच्या जवानांनीही या कारवाईत सहभाग घेतला होता. पाकिस्तान आणि फुटीरतावादी गटाशी असलेल्या संबंधांमुळे २०१९ साली केंद्र सरकारने जमात-ए-इस्लामीवर बंदी घातली होती. NIA […]

Mumbaitak
follow google news

जम्मू आणि काश्मीर मध्ये आज NIA (National Investigation Agency) ने सर्वात मोठी कारवाई केली आहे. जमात-ए-इस्लामी या बंदी घातलेल्या अतिरेकी संघटनेशी संबंधित १४ जिल्ह्यांमधल्या ५० ठिकाणी NIA ने आज छापेमारी केली. जम्मू-काश्मीर पोलीस, सीआरपीएफच्या जवानांनीही या कारवाईत सहभाग घेतला होता. पाकिस्तान आणि फुटीरतावादी गटाशी असलेल्या संबंधांमुळे २०१९ साली केंद्र सरकारने जमात-ए-इस्लामीवर बंदी घातली होती.

हे वाचलं का?

NIA ला मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीर परिसरात जमात-ए-इस्लामीच्या सभासदांकडून पुन्हा एकदा छुप्या हालचालींना सुरुवात झाली होती. अतिरेकी हल्ल्यासाठी पैसे जमा करण्याचं काम सुरु असल्याची माहिती NIA ला मिळाली. यासाठी DIG दर्जाचे वरिष्ठ अधिकारी दिल्लीवरुन श्रीनगरला रवाना झाले होते. NIA च्या पथकाने यानंतर श्रीनगर, बडगाम, गांदेर्बल, बारामुल्ला, कुपवाडा, बांदीपोरे, अनंतनाग, शोपिअन, पुलवामा, कुलगाम, रंबान, दोडा, किश्तवार आणि राजौरी जिल्ह्यांमध्ये ही छापेमारी करण्यात आली.

लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिद्दीन यासारख्या अतिरेकी संघटनांना हल्ल्यासाठी आर्थिक सहाय्य देण्याचं काम जमात-ए-इस्लामीचे सदस्य करत होते. जमात-ए-इस्लामीचे काही सदस्य पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISI च्या मदतीने टर्की आणि दुबईतून हवालाच्या माध्यमातून पैशांची देवणाघेवाण करत होते. आरोग्य, शिक्षण व्यवस्था आणि दानधर्माच्या नावाखाली मनी लाँड्रींगच्या माध्यमातून पैसा जम्मू-काश्मीरमध्ये आणला जात होता अशी माहिती NIA च्या सूत्रांनी दिली.

३१ जुलै रोजी NIA ने लष्कर-ए-मुस्तफाचा टॉप कमांडर हिदायतउल्ला मलिकला अटक केली होती. त्याच्या अड्ड्यावर NIA ला IED आणि इतर स्फोटकांचा साठा सापडला होता. या पार्श्वभूमीवर NIA ने आज केलेल्या छापेमारीला महत्व प्राप्त झालं आहे.

    follow whatsapp