राज्यात नव्याने निर्बंध लावण्याचा कोणताही प्रस्ताव नाही – Rajesh Tope यांची माहिती

मुंबई तक

• 12:34 PM • 07 Sep 2021

सणासुदीचे दिवस जवळ आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होत असल्यामुळे तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात नव्याने निर्बंध लादले जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. परंतू सध्याच्या घडीला सरकार कोणत्याही पद्धतीने नव्याने निर्बंध लावायच्या विचारात नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी स्पष्ट केलंय. काही दिवसांवर आलेल्या […]

Mumbaitak
follow google news

सणासुदीचे दिवस जवळ आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होत असल्यामुळे तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात नव्याने निर्बंध लादले जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. परंतू सध्याच्या घडीला सरकार कोणत्याही पद्धतीने नव्याने निर्बंध लावायच्या विचारात नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी स्पष्ट केलंय.

हे वाचलं का?

काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाच्या निमीत्ताने गर्दी टाळण्याची सूचना राजेश टोपेंनी जनतेला केली आहे. “यात कोणतंही रॉकेट सायन्स नाही. जर सार्वजनिक ठिकाणांवर गर्दी वाढली तर रुग्णसंख्येत वाढ होत जाईल हे इतकं सोप्पं गणित आहे. राज्यातील जनताही सर्व नियमांचं पालन करुन गणेशोत्सव साजरा करेल असा मला विश्वास आहे. केंद्र सरकारने विशेषकरुन केरळ आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये गर्दी टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत.”

गणेशोत्सवात सर्व सार्वजनिक मंडळांनी आपल्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी गर्दी होणार असे तिकडे मंडळाने कोविडच्या सर्व नियमांचं पालन होईल याची खबरदारी घेणं गरजेचं आहे. महाराष्ट्र हे प्रगतशील राज्य आहे त्यामुळे सर्व गणेशभक्तांना मी आवाहन करेन की त्यांनी कोरोनाच्या नियमांचं पालन करावं, असं आवाहन टोपेंनी जनतेला केलं आहे.

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागपुरात तीन-चार दिवसांत निर्बंध लागू होणार – नितीन राऊतांची माहिती

दरम्यान वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात नव्याने निर्बंध घालण्याची शक्यता टोपेंनी फेटाळून लावली आहे. “निर्बंध लादण्याबद्दल माझी आणि मुख्यमंत्र्यांची कोणतीही चर्चा झालेली नाही. आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्री यांच्यात सध्या असा कोणताही प्रस्ताव समोर आलेला नाहीये. परंतू भविष्यात येऊ शकणाऱ्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता मी सर्व नागरिकांना पुन्हा एकदा कोविडच्या सर्व नियमांचं तंतोतंत पालन करावं असं आवाहन करेन.”

    follow whatsapp