स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त मुंबईत झालेल्या पुतळा अनावरणाच्या दिमाखदार सोहळ्याला महाविकासआघाडीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. मात्र या बाळासाहेबांच्या वाढदिवसानंतर राहुल गांधीच्या मुद्दावरुन शिवसेनेला लक्ष केले आहे.
ADVERTISEMENT
बाळासाहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी सर्व प्रमुख नेत्यांनी बाळासाहेबांना अभिवादन केले होते. पण राहुल गांधीनी अशा आशयाचे काही ट्विट केले नव्हते.
हाच धागा पकडून भाजप आमदार आणि प्रवक्ते असलेले अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला लक्ष केले आहे.
शिवसेनेला लक्ष करताना भातखळकरांनी ‘सामनाने दुनियेला सल्ले देण्यापेक्षा राहुल गांधीनी अवघ्या शिवसेनेला जोड्याकडे का उभे केले आहे त्याचा विचार करावा? शिवसेनाप्रमुखांना जयंती दिनी अभिवादन न करणाऱ्या राहुल गांधीना रोज मुखपत्रातून मुजरा करण्याचे दिवस आलेत तुमच्यावर…’
राज्य सरकारने पद्म पुरस्कारासाठी केंद्राला जी काही नावं सुचवली होती त्यात मुकेश अंबानी यांच्यासोबत संजय राऊतांच्या नावाचासुध्दा समावेश होता, पण केंद्राने या सगळ्या नावांवर फुली मारली.
शेतकरी आंदोलनात अंबानींच्या नावाला जोरदार विरोध होत आहे आणि य़ाच शेतकरी आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा आहे. यावरुनसुध्दा शिवसेना दुटप्पी भूमिका घेत आहे अशी टीका भातखळकरांनी केली आहे.
ADVERTISEMENT