जगभरात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका वाढत असून, अनेक देशांकडून लसीकरणावर भर दिला जात आहे. महत्त्वाचं म्हणजे आता कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटविरुद्ध लस किती प्रभावी आहे, याबद्दलही प्रश्न उपस्थित होत असून, लॅन्सेटमधील नव्या अभ्यासाने लस घेतलेल्यांचीही चिंता वाढवली आहे. कोविशिल्ड लसीचा परिणाम किती महिने राहतो, याबद्दल महत्त्वाचं निरीक्षण या अभ्यासातून नोंदवण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
लॅन्सेटमधील नवीन अभ्यासात कोविशिल्ड लसीचे दोन डोस घेतल्यानंतर मिळणारी सुरक्षा किती दिवस टिकून राहते याबद्दल निष्कर्ष मांडण्यात आले आहेत. ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेकाच्या कोविशिल्ड लसीमुळे मिळणारी सुरक्षा तीन महिन्यानंतर कमी होत जात आहे, असं या अभ्यासात म्हटलं आहे.
ही बाब भारतीयांची चिंता वाढवणारी आहे, कारण भारतात जास्तीत जास्त लोकांनी कोविशिल्ड लस घेतलेली आहे. संशोधकांनी कोविशिल्डच्या कोरोनाविरुद्ध परिणामकारकतेबद्दल ब्राझील आणि स्कॉटलंडमध्ये आकडेवारीच्या आधारे हा अभ्यास केला आहे. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी अॅस्ट्राझेनेकाची लस घेतली आहे. त्यांना गंभीर आजारांपासून सुरक्षा मिळवण्यासाठी बुस्टर डोज दे्ण्याची गरज असल्याचंही म्हटलं आहे.
Omicron Variant : नाईट कर्फ्यूसह निर्बंध लावण्याची केंद्राची सूचना; राज्यांना अलर्ट
किती नागरिकांचा करण्यात आला अभ्यास?
अॅस्ट्राझेनेकाची लस घेतलेल्या स्कॉटलंडमधील 20 लाख तर ब्राझीलमधील 4.2 कोटी लोकांवर हा अभ्यास करण्यात आला. अभ्यास करणाऱ्या संशोधकांनी सांगितलं की, स्कॉटलंडमध्ये दुसरा डोज घेतल्यानंतर दोन महिन्यानंतरच्या तुलनेत पाच महिन्यानंतर रुग्णालयात भरती होणाऱ्या आणि मृतांच्या संख्येत पाच टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.
संशोधकांना अभ्यासात काय सापडलं?
लसीच्या परिणामकारकतेत जवळपास तीन महिन्यानंतर घट होण्यास सुरूवात होतेय. दुसरा डोज घेतल्यानंतरचे दोन आठवडे आणि दुसरा डोज घेतल्यानंतर पाच आठवड्यांचा कालवधी, यांची तुलना केल्यास पाच आठवड्यांनंतर मृत्यू होण्याचा धोका दुप्पट होत आहे. ब्राझीलमध्येही संशोधकांना असंच आढळून आलं आहे.
चिंताजनक… Omicron मुळे देशात येणार कोरोनाची महालाट, IIT च्या वैज्ञानिकांचा दावा
ब्रिटनमधील एडिनबर्ग विद्यापीठातील प्राध्यापक अजिज शेख यांनी या अभ्यासाबद्दल सांगितलं की, ‘कोरोना महामारीविरुद्ध लढण्यात लस खूप महत्त्वाची आहे, पण त्याच्या परिणामकारकतेत होणारी घट हा चिंतेचा विषय आहे. ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेकाच्या लसीचा परिणाम किती काळ टिकून राहतो आणि परिणामकारकतेत कधीपासून घट होण्यास सुरुवात होते, याचा अभ्यास करून बुस्टर डोज देण्याबद्दल कार्यक्रम निश्चित करायला हवा, जेणेकरून अधिक कोरोनापासून सुरक्षितता मिळवता येईल’, असं शेख म्हणाले.
ADVERTISEMENT