नुकत्याच पार पडलेल्या कार्तिकी यात्रे मध्ये अंदाजित 3 ते साडेतीन लाख भाविकांनी श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले तर कार्तिक एकादशी दिवशी सुमारे 44 हजार भाविकांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचे मुख दर्शन घेतले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपन्न झालेल्या कार्तिकी यात्रेस लाखो वारकरी आले होते.
ADVERTISEMENT
विठ्ठलाचे दर्शन २४ तास सुरू केल्यानंतर तब्बल तीन लाख ३० हजार ४० वारकऱ्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून ही अधिकृत माहिती देण्यात आली आहे. दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा कार्तिकी यात्रा भरली होती. यात्रेसाठी मोठ्या संख्येने वारकरी येतील, अशी अपेक्षा होती. परंतू एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे भाविकांची संख्या कमी झाली. तरीही एकादशीच्या दिवशी सुमारे साडेतीन लाखांहून अधिक वारकऱ्यांनी उपस्थिती लावली होती. कार्तिकी एकादशी दिवशी 44 हजार वारकऱ्यांनी विठ्ठल दर्शन व घेतले. कार्तिकी एकादशी दिवशी दर मिनिटाला 35 वारकऱ्यांना दर्शन देण्यात येत होते.
एस टी बंद मुळे मंदिर समितीचे उत्पन्न घटले –
कार्तिकी वारी काळात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला देणगी व इतर माध्यमातून 1 कोटी 97 लाख 83 हजार 57 रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळाले आहे. कोरोनानंतर तब्बल दोन वर्षांनंतर मंदिर समितीला हे दोन कोटींचे उत्पन्न मिळाल्याची माहिती कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी दिली. 2020 च्या कार्तिकी यात्रेत 12 लाख 93 हजार 633 रुपये उत्पन्न मिळाले होते. कोरोनाच्या पूर्वी 2019 च्या कार्तिकी यात्रेत 2 कोटी 96 लाख 36 हजार 738 रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाडू प्रसाद, राजगिरा लाडू प्रसाद, भक्तनिवास, दूध जमा, नित्यपूजा, वॉटर एटीएम, विठ्ठल विधी उपचार, वाढदिवस अन्नदान योजना बंद राहिल्याने यापासून उत्पन्न मिळालेले नाही.
पंढरपूर : महाद्वार काल्याने कार्तिक वारीची सांगता
ADVERTISEMENT