सरकारी कंपन्यांनी आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले आहेत. या कंपन्यांनी पुन्हा एकदा दर वाढवले आहेत. मागच्या दहा दिवसातली ही नववी दरवाढ आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत प्रति लिटर ८० ते ८४ पैशांची वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेल त्यामुळे आणखी महाग झालं आहे.
ADVERTISEMENT
इंधन कंपनी IOCL ने जाहीर केलेल्या नव्या दरांनुसार राजधानी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेल ८० पैशांनी महाग झालं आहे. त्यामुळे दिल्लीत पेट्रोल १०१ रूपये प्रति लिटरच्याही पुढे गेलं आहे. तर डिझेल ९३.७ रूपये प्रति लिटर झालं आहे. मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर ८४ पैशांनी महाग झाले आहेत त्यामुळे मुंबईत पेट्रोल प्रति लिटर ११६.७२ रूपये झालं आहे तर डिझेल १००.९४ रूपये लिटर झालं आहे.
चेन्नईत पेट्रोल ७६ पैशांनी महाग झालं आहे. त्यामुळे तिथे पेट्रोलचा दर १०७.४५ रूपये प्रति लिटर झाला आहे. तर डिझेल ९२.५२ रूपये प्रति लिटर झालं आहे. कोलकाता मध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे ८३ पैसे आणि ८० पैसे वाढ झाली आहे. त्यामुळे कोलकातामध्ये पेट्रोल १११.३५ रूपये लिटर तर डिझेल ९६.२२ रूपये लिटर झालं आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू झालं आहे. त्यामुळे कच्चं तेल प्रति बॅरल १३० डॉलरवरून १०३ प्रति डॉलरपर्यंत खाली आलं आहे. तरीही राष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेल यांचे दर गेल्या दहा दिवसात सातत्याने वाढत आहेत. आत्तापर्यंत दहा दिवसातल्या नऊ दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार अद्यापही ही दरवाढ थांबणार नाही तर सुरूच राहणार आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज अपडेट केल्या जातात. तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीची माहिती अपडेट करतात. नोव्हेंबरपासून भारतातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर होत्या. पण आता त्यांना पुन्हा वाढ होऊ लागली आहे.
पेट्रोल-डिझेलच्या किंमती अशा पद्धतीने जाणून घ्या:
तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज समजू शकतात. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल.
ADVERTISEMENT