पीएस किसान योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर आज जमा करण्यात आला आहे. याचा लाभ देशभरातील 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 20 हजार कोटी रूपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला. यावेळी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर, काही राज्यांचे मुख्यमंत्री आणि काही खासदार या कार्यक्रमाला व्हीडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना ईद आणि अक्षय तृतीयेच्या शुभेच्छाही दिल्या.
ADVERTISEMENT
प.बंगालच्या शेतकऱ्यांना पहिल्यांदाच या योजनेचा लाभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘कोरोना काळात देशातील शेतकऱ्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं आणि अन्नधान्याचं विक्रमी उत्पादन घेतलं. बंगालच्या लाखो शेतकऱ्यांना आज पहिल्यांदाच या योजनेचा लाभ मिळतो आहे. त्यांच्या खात्यावर पहिला हप्ता जमा होतो आहे. ज्याप्रमाणे राज्याकडून शेतकऱ्यांच्या नावाची यादी केंद्र सरकारला पाठवली जाईल त्याप्रमाणे संख्येत भर पडेल.’
कोरोना काळात भारतात जगातील सर्वात मोठी मोफत धान्यांची योजना सुरू करण्यात आली होती. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत गेल्या वर्षी आठ महिने मोफत धान्य वाटप करण्यात आलं होतं. या वर्षी मे आणि जूनमध्ये देशातील ८० कोटींपेक्षा जास्त लोकांना मोफत धान्य देण्याचे नियोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान किसान योजनेच्या अंतर्गत लाभार्थी शेतकरी परिवाराला प्रत्येक वर्षी 6000 तीन हप्त्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जातात. आत्तापर्यंत एकूण रकमेचा विचार करता 1.5 लाख कोटी रूपये शेतकऱ्यांना 8 हप्त्यांच्या माध्यमातून देण्यात आले आहेत.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सहा शेतकऱ्यांशी संवाद साधला.
अरविंद निषाद, उन्नाव, उत्तर प्रदेश
वेण्णुरअम्मा, अंतरपूर, आंध्र प्रदेश
रेविस्तर खरूमुनिद, मेघालय
पॅट्रिक -अंदमान निकोबार
खुर्शीद अहमद, श्रीनगर
बाळासाहेब नरारे, लातूर, महाराष्ट्र
ADVERTISEMENT