मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. १९ जानेवारीला नरेंद्र मोदी मुंबई मेट्रोसह विविध प्रकल्पांच्या भूमिपूजन आणि उद्घाटनांसाठी आले होते, त्यानंतर अवघ्या २० दिवसांतच म्हणजेच १० फेब्रुवारीला पुन्हा मोदींचा मुंबई दौरा नियोजित करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
मोदींच्या मुंबई दौऱ्यात काय होणार?
मुंबईतल्या मरोळमध्ये बोहरा मुस्लिम समाजाचा एक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला नरेंद्र मोदी उपस्थिती लावण्याची शक्यता आहे. याशिवाय या कार्यक्रमात एका रुग्णालयाचं लोकार्पणही मोदींच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. (Prime Minister Narendra Modi on Mumbai visit on 10 February)
मोदींच्या मुंबई दौऱ्याआधीच भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी पार पडली होती. यात नरेंद्र मोदींनी पसमिंदा आणि बोहरा समाजापर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्याचा आणि त्यांच्याशी जोडण्याचा संदेश भाजप नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दिला होता. बोहरा समाज हा गुजरातशी जोडला गेलेला असून काही प्रमाणात महाराष्ट्रातही वास्तव्य आहे. तर पसमिंदा हा मुस्लिम समाजातील मागासवर्गीय समजला जाणार वर्ग असून त्यांची लोकसंख्या सर्वाधिक म्हणजे एकूण मुस्लिम लोकसंख्येच्या जवळपास ८५ टक्के आहे.
Mood of the Nation: मोदी की गांधी, आज निवडणुका झाल्या तर कोणाची येईल सत्ता?
गुजरातमध्ये याच बोहरा समाजापर्यंत पोहोचण्याचा नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना भाजपला फायदा झाला होता, तोच प्रयत्न आता महाराष्ट्रात खासकरुन मुंबईत केला जाऊ शकतो. मुंबईतल्या दक्षिण मुंबईतल्या पट्ट्यात बोहरा मुस्लिम समाजाचं वास्तव्य जास्त आहे. त्यामुळे मोदी मुंबईत येऊन बोहरा मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमाला हजेरी लावतात का? आणि तिथे काय बोलणार याकडे सगळ्यांच लक्ष राहीलच.
BMC च्या ‘फिक्स्ड डिपॉझिट’वर मोदी, फडणवीसांचा डोळा -भास्कर जाधव
पण अवघ्या २० दिवसांत दुसऱ्यांदा होणाऱ्या मुंबई दौऱ्यामुळे पुन्हा एकदा मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसाठी हे दौरे सुरू आहेत का या चर्चांना वाव आहे. अशातच लोकसत्ता वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटलंय की मुंबई महापालिका निवडणूक पंतप्रधान मोदी आणि फडणवीस यांचा चेहरा जनतेपुढे ठेवून आम्ही लढवू. त्यामुळे आगामी काळात पंतप्रधान मोदींचे मुंबई दौरे वाढणार यात काही शंका नाही.
ADVERTISEMENT