पंतप्रधान नरेंद्र मोदी जगात भारी! ‘या’ सर्व्हेमध्ये ठरले सर्वात लोकप्रिय नेते

मुंबई तक

• 05:33 AM • 21 Jan 2022

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक पातळीवरच्या एका सर्वेक्षणात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या नेत्यांमध्ये पहिल्या क्रमांकाचं स्थान पटकावलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अप्रुव्हल रेटिंगही इतर कोणत्याही नेत्यापेक्षा सर्वाधिक आहे. 71 टक्के अप्रुव्हल रेटिंग मिळवत मोदी जगात भारी नेते असल्याचं समोर आलं आहे. अमेरिकेतील ग्लोबल लीडर अप्रुव्हल ट्रॅकर मॉर्निंग कन्सल्टने हे सर्वेक्षण केलं आहे. जगभरातल्या 13 […]

Mumbaitak
follow google news

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक पातळीवरच्या एका सर्वेक्षणात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या नेत्यांमध्ये पहिल्या क्रमांकाचं स्थान पटकावलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अप्रुव्हल रेटिंगही इतर कोणत्याही नेत्यापेक्षा सर्वाधिक आहे. 71 टक्के अप्रुव्हल रेटिंग मिळवत मोदी जगात भारी नेते असल्याचं समोर आलं आहे. अमेरिकेतील ग्लोबल लीडर अप्रुव्हल ट्रॅकर मॉर्निंग कन्सल्टने हे सर्वेक्षण केलं आहे.

हे वाचलं का?

जगभरातल्या 13 नेत्यांना पिछाडीवर टाकत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही लोकप्रियता मिळवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता अमेरिका, युके, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझिल, फ्रान्स आणि जर्मनी या 13 देशांमधील नेत्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे हेच सर्व्हेक्षण सांगतं आहे.

या सर्वेक्षणामध्ये जगभरातील 13 मोठ्या नेत्यांचा कामगिरीचा आढावा घेण्यात आला. यात अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे सहाव्या स्थानी आहेत. त्यांना 43 टक्के लोकांनी पाठिंबा दर्शवला आहे. बायडेन यांच्या खालोखाल कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन त्रुदो यांचा क्रमांक या यादीमध्ये लागलाय. त्रुदो यांनाही 43 टक्के लोकांनी पाठिंबा दर्शवला आहे. त्या खालोखाल ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांचा क्रमांक असून 41 टक्के लोकांनी मॉरिसन यांच्या बाजूने मतदान केलंय.

मॉर्निंग कन्सल्टच्या मालकीची पॉलिटिकल इंटेलिजन्स ही निवडणुका, निवडून आलेले उमेदवार आणि मतदानाच्या समस्यांवर रिअल-टाइम पोलिंग डेटा प्रदान करते. मॉर्निंग कन्सल्ट जागतिक स्तरावर 11 हजारहून अधिक मुलाखती घेते आणि अमेरिकेतील ५ हजार नोंदणीकृत मतदारांच्या अध्यक्षीय निवडणुकांबद्दल मुलाखती घेते. तर, भारतात सर्वेक्षणात सहभागी केल्या जाण्याऱ्या लोकांच्या ऑनलाइन मुलाखती घेतल्या जातात. प्रत्येक देशात वय, लिंग, प्रदेश, शिक्षण आणि काही विशिष्ट देशांमध्ये अधिकृत सरकारी स्त्रोतांवर आधारित सर्वेक्षण केले जाते.

या यादीत ज्यांना शेवटचं स्थान मिळालं आहे त्यात 11 व्या स्थानी ब्राझिलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो, 12 व्या स्थानी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि 13 व्या स्थानी ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन आहेत. बोल्सोनारो यांना 37 टक्के, मॅक्रॉन यांना 34 टक्के तर जॉन्सन यांना अवघी 26 टक्के मतं मिळाली आहे.

    follow whatsapp