PM मोदींची इच्छा २ आठवड्यांत पूर्ण! BMC हजारो कोटींच्या ठेवी मोडणार

मुंबई तक

05 Feb 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:06 AM)

BMC budget 2023 | PM Narendra Modi : मुंबई : महानगरपालिका येणाऱ्या काळात ११ हजार ६१५ कोटींच्या ठेवी मोडणार आहे. आयुक्त आणि प्रशासक इक्बालसिंह चहल (Iqbal singh chahal) यांनी शनिवारी (४ फेब्रुवारी) सादर केलेल्या ५२, हजार ६१९ कोटींचा महापालिकेचा अर्थसंकल्प सादर केला. याच अर्थसंकल्पामध्ये याबाबतची तरतूद केली आहे. दरम्यान, या निर्णयावरुन मोठे राजकीय पडसाद उमटण्याची […]

Mumbaitak
follow google news

BMC budget 2023 | PM Narendra Modi :

हे वाचलं का?

मुंबई : महानगरपालिका येणाऱ्या काळात ११ हजार ६१५ कोटींच्या ठेवी मोडणार आहे. आयुक्त आणि प्रशासक इक्बालसिंह चहल (Iqbal singh chahal) यांनी शनिवारी (४ फेब्रुवारी) सादर केलेल्या ५२, हजार ६१९ कोटींचा महापालिकेचा अर्थसंकल्प सादर केला. याच अर्थसंकल्पामध्ये याबाबतची तरतूद केली आहे. दरम्यान, या निर्णयावरुन मोठे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे. मुदत ठेवी मोडल्या तरी त्या विकासकामांसाठीच वापराल्या जातील असं चहल यांनी स्पष्ट केलं आहे. (Iqbal singh chahal presents Rs 52,619 crore BMC Budget for FY’24)

काही दिवसांपासून महापालिकेच्या ८८ हजार कोटींच्या मुदत ठेवी चर्चेत आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९ जानेवारीला मुंबईत विकासकामांचं उद्घाटन केल्यानंतर झालेल्या सभेत या ठेवींबाबत भाष्य केलं होतं. मुंबईकडे पैशांची कमी नाही. पण हा पैसा योग्य जागी वापरला गेला, तरचं प्रकल्पाद्वारे विकास होईल. जर तो पैसा तिजोरीत पडून राहिला तर मुंबईचा विकास कसा होईल? असं ते म्हणाले होते.

PM मोदींचं मुंबईत तडाखेबाज भाषण, ‘हे’ आहेत 10 महत्त्वाचे मुद्दे

यावर प्रत्युत्तर देताना शिवसेना पक्षप्रमुख (UBT) उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. “मोदी जे बोलले ते भयानक आहे. भक्त अंध समजू शकतो पण गुरु सुध्दा? २००२ पर्यंत महापालिका तुटीत होती. तेव्हाचे आयुक्त सुबोधकुमार आणि आपल्या लोकांनी ती सशक्त केली. मनपाचे अनेक उपक्रम त्या ठेवींमधून होतात. कोस्टल रोड आपण विनाटोल देत आहोत. ३० ते ४० टक्के ही रक्कम कामगारांसाठी आणि इतर कामांसाठी आहे, असं ठाकरेंनी म्हटलं होतं.

Uddhav Thackeray : मोदी आले तरी ‘बाळासाहेबांशिवाय’ मतं मिळू शकत नाहीत!

या आरोप-प्रत्यारोपांनंतर मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रशासर इक्बालसिंह चहल यांनी या ठेवी मोडण्याबाबत अर्थसंकल्पात उल्लेख केला आहे. चहल यांच्या या निर्णयवार शिवसेना (UBT) संजय राऊत यांनी टीका केली आहे. ट्विट करत ते म्हणाले, काल मुंबईच्या तिजोरीमध्ये पहिला हात टाकण्यात आला. जवळपास १२ हजार कोटी रुपये महानगरपालिकेच्या ठेवीमधून काढण्याची तरतूद काल महापालिकेच्या बजेटमध्ये करण्यात आली. केंद्राच्या मित्राने देशाचा बाजार उठवला. आता महाराष्ट्राचा तथाकथित मित्र मुंबईचा बाजार उठवेल. मुंबईकरांनो सावध व्हा, असं ते म्हणाले.

    follow whatsapp