मुंबईत पंकजा मुंडे यांच्या वरळी येथील निवासस्थानी गर्दी केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. ३ आयोजकांसह ४२ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रीतम मुंडे यांना मंत्रीमंडळात स्थान नाकारण्यात आल्यानंतर नाराज मुंडे समर्थकांनी पंकजा मुंडे यांच्या निवासस्थानी मंगळवारी गर्दी केली होती. या छोटेखानी सभेत १०० पेक्षा जास्त कार्यकर्ते हजर होते.
ADVERTISEMENT
पंकजा मुंडे यांनी निवासस्थानातून कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना एकाप्रकारे आपलं शक्तीप्रदर्शन घडवलं. त्यामुळे गर्दी जमवल्याप्रकरणी ३ आयोजकांसह ४२ कार्यकर्त्यांवर कलम 188, 269, 37 (3), 135 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींना नोटीस देऊन पोलिसांनी सोडलं.
यावेळी कार्यकर्त्यांशी बोलत असताना पंकजा मुंडे यांनी राज्यातील भाजप नेतृत्वालाही सूचक इशारा दिला आहे. मला जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत मी धर्मयुद्ध टाळत राहीन असं म्हणत पंकजा यांनी टोला लगावला आहे.
Pankaja Munde यांच्या आक्रमक भाषणातील दहा महत्त्वाचे मुद्दे!
पांडवांनी महाभारताचं युद्ध जिंकलं. धर्मयुद्ध टाळण्यासाठी त्यांनी आटोकात प्रयत्न केला. पाच गावांची मागणी केलेली असतानाही कौरवांनी सुईच्या टोकावर येईल एवढीही जमीन देणार नाही अशी भूमिका घेतली. पण पांडवांनी नेहमी धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न केला. कारण जो चांगला असतो तो नेहमी धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न करत असतो. मी देखील मला शक्य असेल तोपर्यंत हा प्रयत्न करत राहीन असं म्हणत पंकजा मुंडे यांनी राज्यातील भाजप नेतृत्वाला सूचक इशारा दिला आहे.
माझा नेता मोदी, माझा नेता अमित शाहा; आपण कशाला घाबरायचं? – मुंबईतून Pankaja Munde यांची टोलेबाजी
ADVERTISEMENT