OBC Reservation च्या बैठकीत मंत्रालयात बत्ती गुल, मुख्यमंत्र्यांचं ‘कनेक्शन’ तुटलं

मुंबई तक

11 May 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 08:57 AM)

ऋत्विक भालेकर, प्रतिनिधी, मुंबई मंत्रिमंडळ बैठकीत ओबीसी आरक्षणाच्या (Obc Reservation) मुद्द्यावर चर्चा सुरू असताना अचानक बत्ती गुल (Power Cut) झाल्याची घटना घडली आहे. व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी कनेक्शन तुटलं. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा विषय आणि निवडणूक प्रक्रिया कशी राबवायची या चर्चेत खंड पडला. आज मंत्रिमंडळ बैठक सुरू असताना मंत्रलायातील वीज पुरवठा खंडित […]

Mumbaitak
follow google news

ऋत्विक भालेकर, प्रतिनिधी, मुंबई

हे वाचलं का?

मंत्रिमंडळ बैठकीत ओबीसी आरक्षणाच्या (Obc Reservation) मुद्द्यावर चर्चा सुरू असताना अचानक बत्ती गुल (Power Cut) झाल्याची घटना घडली आहे. व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी कनेक्शन तुटलं. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा विषय आणि निवडणूक प्रक्रिया कशी राबवायची या चर्चेत खंड पडला.

आज मंत्रिमंडळ बैठक सुरू असताना मंत्रलायातील वीज पुरवठा खंडित झाल्याने ओबीसी आरक्षणावरची चर्चा पूर्ण होऊ शकली नाही.आता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सर्व पक्षीय नेत्यांची बैठक घेण्यात येणार आहे. तर वीज पुरवठा खंडित होण्यास ऊर्जा विभाग जबाबदार नाही तर बेस्टची वीज असल्याचा मिश्किल टोला ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी लगावला आहे.

ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC Reservation) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Elections) घ्या असा महत्त्वाचा निर्णय १० मे रोजी सुप्रीम कोर्टाने दिला आहे. देशातली सर्व राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर महापालिका निवडणुका एकत्रित न होता दोन टप्प्यात घेतल्या जातील अशी शक्यता निर्माण झाली आहे.

ओबीसी आरक्षणावरील फडणवीसांचे बोल म्हणजे ‘पुतना मावशीचं प्रेम’-नाना पटोले

ओबीसी आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिल्याने आता नेमकं काय करायचं? काय भूमिका घ्यायची हे ठरवण्यासाठीच आजची बैठक होती. मात्र मंत्रिमंडळ बैठक सुरू असतानाच लाईट गेले. हा प्रकार नेमका का झाला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र यात उर्जा विभागाचा काही दोष नाही तर बेस्ट कडून वीज पुरवठा खंडीत झाला आहे असं नितीन राऊत यांनी म्हटलं आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहणार होते. मात्र त्यांच्याशी असलेलं कनेक्शनही तुटलं. त्यामुळे चर्चा खंडीत झाली.

Election : राज्यातील १४ महानगरपालिकांच्या निवडणुका दोन टप्प्यात होण्याची शक्यता

दरम्यान ज्या महानगरपालिकांची मुदत संपून सहा महिने किंवा एक वर्ष झालं आहे अशा महापालिकांची निवडणूक ही पहिल्या टप्प्यात घेतली जाणार आहे तर ज्या महापालिकांची मुदत नुकतीच संपली आहे त्या महापालिका निवडणुका दुसऱ्या टप्प्यात घेतल्या जाण्याची शक्यता आहे.

मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, नागपूर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, वसई-विरार, उल्हासनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, अकोला, अमरावती या महापालिकांच्या निवडणुका होणं प्रलंबित आहे. या महापालिका निवडणुका म्हणजे मिनी विधानसभाच मानली जाते आहे. अशात या निवडणुका दोन टप्प्यात घेतल्या जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे. नेमका याबाबत राज्य निवडणूक आयोग काय निर्णय घेणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp