NCP नेते प्रफुल्ल पटेल यांच्या मुलाच्या लग्नात अंबानी-अदाणी, 35 विमानांतून आले पाहुणे

मुंबई तक

• 10:58 AM • 19 Dec 2021

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या मुलाचं लग्न जयपूरमध्ये आहे. या लग्नासाठी म्हणजेच प्रजय पटेलच्या लग्नासाठी जयपूरमध्ये VIP पाहुणे आले आहेत. राजस्थानची राजधानी जयपूरच्या रामबाग पॅलेस हॉटेलमध्ये हे लग्न पार पडतं आहे. या समारंभासाठी अनिल अंबानी, गौतम अदाणी यांच्यासह बॉलिवूडच्या तारे-तारकांची उपस्थिती आहे. एवढंच नाही तर विविध पक्षांचे नेतेही या समारंभसाठी आले […]

Mumbaitak
follow google news

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या मुलाचं लग्न जयपूरमध्ये आहे. या लग्नासाठी म्हणजेच प्रजय पटेलच्या लग्नासाठी जयपूरमध्ये VIP पाहुणे आले आहेत. राजस्थानची राजधानी जयपूरच्या रामबाग पॅलेस हॉटेलमध्ये हे लग्न पार पडतं आहे. या समारंभासाठी अनिल अंबानी, गौतम अदाणी यांच्यासह बॉलिवूडच्या तारे-तारकांची उपस्थिती आहे. एवढंच नाही तर विविध पक्षांचे नेतेही या समारंभसाठी आले आहेत.

हे वाचलं का?

आज तकला मिळालेल्या माहितीनुसार प्रजय पटेलच्या लग्नासाठी बॉलिवूडमधले कलाकार, व्यावसायिक, क्रिकेटर्स हे सगळे लोक आपल्या कुटुंबीयांसह लग्न सोहळ्यासाठी पोहचले आहेत. 18 डिसेंबरपर्यंत म्हणजेच शनिवारपर्यंत सुमारे 35 विमानातून विविध दिग्गज लोक या सोहळ्यासाठी आले आहेत. व्यावसायिका सज्जन जिंदल, अदानी ग्रुपचे प्रमुख गौतम अदाणी, अनिल अंबानी आणि त्यांची पत्नी टीना अंबानी, भारती एअरटेल समूहाचे चेअरमन सुनील भारती त्यांची पत्नी, हिंदूजा समूहाचे श्रीचंद हिंदूजा हे सगळे लग्नासाठी पोहचले आहेत.

प्रफुल पटेलांच्या मुलाच्या लग्नात सलमान खान, अनिल कपूर, शिल्पा शेट्टीसह कलाकारांनी ‘जुम्मे की रात है’वर धरला ठेका

या सोहळ्यासाठी सलमान खान, शिल्पा शेट्टी, शिवसेना प्रवक्ते संजय राऊत, वेदांत रिसोर्सेजचे संस्थापक अनिल अग्रवाल, भारतीय क्रिकेट टीमचे माजी कोच रवि शास्त्री हे देखील लग्नासाठी पोहचले आहेत. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ, टाटा मेमोरियल रूग्णालयाचे वरिष्ठ चिकित्सक आर.के. देशपांडे, महाराष्ट्र सरकारमधले मंत्री एकनाथ शिंदे, एनसीपीचे प्रमुख शरद पवार त्यांची मुलगी सुप्रिया सुळे हे सगळे जयपूरला पोहचले आहेत.

हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भुपेंद्र सिंह हुड्डा, प्रफुल्ल पटेल यांचे भाऊ अमरिश पटेल, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लाल, डॉक्टर केतन देसाई तसचं भाजपचे राजीव प्रताप रूडी हे पण जयपूरमध्ये पोहचले आहेत. या पाहुण्यांसाठी विमानतळावरही खास व्यवस्था करण्यात आली होती. तसंच एअरपोर्टवरही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा मुलगा प्रजय हा सलमान खानचा फॅन आहे. त्यामुळे सलमान खानला या लग्नात बोलवण्यात आलं. सलमानला निमंत्रण गेल्यापासूनच तो येईल का? याची उत्सुकता प्रजयला होती. तो आल्यानंतर आणि डान्स केल्यानंतर आता प्रजयला आस्मान ठेंगणं झालं आहे.

या शाही लग्नात शिवसेना नेते संजय राऊत, वेदांत रिसोर्सेज लिमिटेडचे संस्थापक अनिल अग्रवाल, हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भुपेंद्र सिंह हुड्डा, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला, जया बच्चन, डॉक्टर केतन देसाई आणि भाजपचे अनेक दिग्गज नेतेही उपस्थित राहिले असंही दिसून आलं आहे. मात्र चर्चा होते आहे ती या व्हीडिओची आणि सलमान, शिल्पा आणि अनिल कपूर या तिघांनी जो ठेका धरला त्याची.

    follow whatsapp