Ajit Pawar Candidates List : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीत कोणत्या लाडक्या बहिणींना संधी?

रोहिणी ठोंबरे

23 Oct 2024 (अपडेटेड: 23 Oct 2024, 01:47 PM)

Ajit Pawar Candidates First List : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार यादी जाहीर करायला सुरुवात केली आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

अजित दादा गटाने कोणत्या लाडक्या बहिणींना दिली संधी?

point

राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली उमेदवार यादी

Ajit Pawar Candidates First List : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार यादी जाहीर करायला सुरुवात केली आहे. काल महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने पहिली उमेदवार यादी जाहीर केली. तर, आता राष्ट्रवादी अजित पवार गटाती पहिली यादी जाहीर झाली आहे. 38 उमेदवारांची पहिली यादी अजित पवार गटाने जाहीर केली आहे. यामध्ये आता कोणत्या लाडक्या बहिणींना संधी मिळाली आहे? जाणून घ्या... (NCP Ajit Pawar Candidates in first list how many women canidate got ticket maharashtra vidhan sabha election 2024)

हे वाचलं का?

भाजपाने पहिल्या यादीत 99, शिवसेना शिंदे गटाने 45 आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने 38 जणांना उमेदवारी जाहीर केली आहे. एकूणच आता 106 जागांवर उमेदवार जाहीर होणं बाकी आहे. त्यामुळे कोणाच्या वाटेला सर्वात जास्त आणि कोणाच्या वाटेला कमी जागा येणार हे पाहणं रंजक असेल.

हेही वाचा : Ajit Pawar Candidates List: अजितदादांचा मोठा डाव, NCP ची पहिली यादी आली समोर

अजित दादा गटाने कोणत्या लाडक्या बहिणींना दिली संधी?

सध्या महाराष्ट्रात महायुतीची लाडकी बहीण योजना तुफान चर्चेत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणलेली ही योजना महायुतीसाठी निवडणुकीत किती फायद्याची ठरतेय याकडे सर्वांचं लक्ष आहे. त्याचबरोबर महायुतीतील तिनही पक्षांची आता पहिली उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये भाजपने 13 महिला उमेदवार, शिवसेना शिंदे गटाने 3 महिला उमेदवार तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने चार महिला उमेदवारांना संधी दिली आहे. 

अजित पवारांनी पहिल्या उमेदवार यादीत चार महिलांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तिकीट दिलं आहे. श्रीवर्धमधून आदिती तटकरे, नाशिक देवळालीमधून सरोज आहिरे, अमरावती शहरमधून सुलभा खोडके आणि पाथरी येथून निर्मला उत्तमराव विटेकर यांना तिकीट दिलंय.

    follow whatsapp