Couple Stunts Shocking Video Viral: करवाचौथचा उत्सव नवविवाहीत महिलांसाठी खूप खास असतो. पतीला दिर्घायुष्य मिळावं यासाठी पत्नी पूर्ण दिवस उपवास करते. त्यानंतर पत्नी सायंकाळी पूर्ण चंद्र दिसल्यावर पतीच्या हातून पाणी पिऊन पत्नी उपवास सोडते. ऑक्टोबर महिन्याच्या 20 तारखेला करवा चौथचा उपवास असणार आहे. करवा चौथआधी सोशल मीडियावर एका कपलचा करवा चौथ साजरा करतानाचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल झाला आहे. शालू जिमनास्ट नावाच्या यूजरने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. (Karwachauth festival is very special for newly married women. The wife fasts for the whole day so that her husband may have a long life)
ADVERTISEMENT
बायकोनं नवऱ्यासोबत केली खतरनाक स्टंटबाजी
इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या व्हिडीओत पाहू शकता की, लाल साडीत सजलेल्या महिलेनं करवाचौथ साजरा करण्यासाठी नवऱ्याच्या खांद्यावर पाय ठेऊन अनोखी स्टंटबाजी केली आहे. शालू जिमनास्ट नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर महिलेचा करवा चौथचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या अकाऊंटवरून एकूण तीन व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत.
लाल साडी घातलेली महिला हातात स्ट्रेनर (चाळणी) घेऊन चंद्राला पाहते. त्यानंतर तीन नवऱ्यासोबत स्टंटबाजी करते. पहिल्या व्हिडीओत पाहू शकता की, पत्ती पतीचा हात पकडून त्याच्या गुडघ्यांवर उभी राहते आणि हातात स्ट्रेनर घेऊन आधी चंद्राकडे पाहते आणि त्यानंतर स्ट्रेनरमधून नवऱ्याला पाहते.
हे ही वाचा >> Ravindra Dhangekar Tweet: रवींद्र धंगेकरांनी काँग्रेसची पहिली यादी फोडली! विधानसभेसाठी कुणाला मिळाली संधी?
इथे पाहा पती-पत्नीचा व्हायरल व्हिडीओ
सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या दुसऱ्या व्हिडीओत पाहू शकता, पत्नी पतीच्या खांद्यावर एक पाय ठेऊन कंबरेला हात ठेऊन समतोल साधण्याचा प्रयत्न करते त्यानंतर स्ट्रेनरमधून पती आणि चंद्राला पाहते. तिसऱ्या व्हिडीओत पत्नी पतीच्या दोन्ही खांद्यांवर पाय ठेऊन हवेत सरळ उभी राहून स्ट्रेनरमधून चंद्राला पाहत असल्याचं दिसत आहे.
हे ही वाचा >> Today Gold Rate: मुंबईसह देशातील 'या' प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे भाव कडाडले! कारण वाचून धडकीच भरेल
स्टंटबाजी करून करवा चौथ साजरा करणाऱ्या महिलेचा हा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 22 लाखांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. व्हिडीओला प्रतिक्रिया देत एका यूजरने म्हटलं, अरे ती तुझी पत्नी आहे, हमाल नाही. दुसऱ्या यूजरने म्हटलं, छतावरून चंद्र दिसत नव्हता. म्हणून त्याच्या खांद्यावर चढून पाहावा लागला. अन्य एका यूजरने म्हटलं, तो पती आहे, महिषासूर नाही.
ADVERTISEMENT