७३व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भारतीयांना संबोधित केलं. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या योद्ध्यांच्या स्मृतींना उजाळा देत राष्ट्रपतींनी नागरिकांना देशाच्या विकासात योगदान देण्याचं आवाहन केलं. ‘आपला गाव, आपलं शहर, आपली कधीही विसरू नका’, असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT
राष्ट्रपती कोविंद यांच्या संबोधनातील प्रमुख मुद्दे…
– ’73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, देश आणि परदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांना माझ्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या सर्वांना एका समान सूत्रात बांधणाऱ्या भारतीयत्वाच्या गौरवाचा हा उत्सव आहे. प्रजासत्ताक दिन हा स्वराज्याच्या स्वप्नपूर्तीसाठी अतुलनीय साहस दाखवलेल्या तसंच त्यासाठी देशवासियांमध्ये संघर्षासाठी उत्साह निर्माण केलेल्या महापुरुषांच्या स्मृतींना उजाळा देण्याचं निमित्त सुद्धा आहे.’
Republic Day 2022 History: …म्हणून 26 जानेवारीलाच साजरा केला जातो प्रजासत्ताक दिन!
– ‘संविधानाच्या संक्षिप्त प्रस्तावनेतही लोकशाही, न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व या मार्गदर्शक तत्त्वांचा, अर्थपूर्ण उल्लेख आहे. या आदर्शांनी जो ठोस पाया रचला आहे, त्यावर आमचं भव्य प्रजासत्ताक भक्कमपणे उभं आहे. राष्ट्रसेवेच्या मूलभूत कर्तव्याचं पालन करत आपल्या कोट्यवधी देशवासीयांनी स्वच्छता मोहिमेसह कोविड लसीकरण मोहीमेला जनआंदोलनाचं रूप दिलं आहे. अशा मोहिमांच्या यशस्वी अंमलबजावणीचं श्रेय आपल्या कर्तव्यनिष्ठ नागरिकांना जातं.’
– ‘गांधीजींची इच्छा होती की आपण स्वतःमध्ये डोकावून पाहायला हवं. आत्मनिरीक्षण करायला हवं आणि चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करायला हवा. तसंच त्यानंतर सभोवताली पहावं. लोकांना मदत करावी आणि एक चांगला भारत व चांगल्या जगाच्या निर्मितीत आपलं योगदान द्यावं.’
महाराष्ट्रातील ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्याचा गौरव; चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक
– ‘मला हे सांगताना अभिमान वाटतो की, आपण कोरोना विषाणूच्या विरोधात असामान्य दृढ संकल्प आणि कार्यक्षमता दाखवून दिली. पहिल्या वर्षातच आपण आरोग्यसेवेच्या पायाभूत सुविधा, विस्तृत तसंच भरभक्कम केल्या आणि इतर देशांच्या मदतीसाठीही पुढे सरसावलो.’
– ‘या महासाथीचा प्रभाव अजूनही व्यापक प्रमाणात कायम आहे. त्यामुळे आपल्याला सतर्क रहायला हवं आणि दक्षतेत थोडीसुद्धा कसर राहता कामा नये. आपण आतापर्यंत जी सावधगिरी बाळगली आहे, ती यापुढेही कायम ठेवायची आहे. मास्क घालणं कोविड प्रतिबंधक वर्तनाचा अविभाज्य भाग आहे.’
प्रजासत्ताकाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा, पाहा महाराष्ट्रातील पद्म पुरस्काराचे मानकरी कोण-कोण
– ‘गेल्या वर्षी आर्थिक विकासात राहून गेलेल्या कमतरतेनंतरही या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेचा दर प्रभावी राहण्याचा अंदाज म्हणजे प्रतिकूल परिस्थितीतही भारताच्या दृढतेचा पुरावाच आहे. हे मागील वर्षी सुरू केलेल्या आत्मनिर्भर भारत मोहिमेच्या यशाचंही निदर्शक आहे.’
– ‘आपली पारंपरिक जीवन मूल्यं आणि आधुनिक कौशल्य यांच्या आदर्श संगमानं युक्त अशा एनईपीच्या माध्यमातून सरकारनं समयोचित वातावरण उपलब्ध केलं आहे. मला हे पाहून खूप आनंद होतोय की जगातल्या सर्वोत्तम अशा 50 नवोन्मेषी अर्थव्यवस्थांमध्ये भारतानं आपलं स्थान निर्माण केलं आहे.’
– ‘भारतातील जे लोक परिश्रम आणि प्रतिभेच्या जोरावर जीवनाच्या शर्यतीत पुढे निघून गेले आहेत, त्यांना माझं असं सांगणं आहे की आपली पाळंमूळं, आपला गाव, वाडी, शहर यांना आणि आपल्या मातीला कधीही विसरू नका.’
– ‘जेव्हा कुठल्याही शूर सैनिकाचं निधन होतं, तेव्हा संपूर्ण देश शोकसागरात बुडतो. गेल्या महिन्यात एका दुर्घटनेत देशातल्या सगळ्यात शूर कमांडरांपैकी एक जनरल बिपीन रावत, त्यांची पत्नी, तसंच अनेक शूर योद्ध्यांना आपण मुकलो. या दुर्घटनेमुळे सर्व देशवासीयांना खूप दुःख झालं. हे वर्ष सशस्त्र दलांमधल्या महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलं आहे. आमच्या कन्यांनी पारंपरिक सीमा ओलांडल्या आहेत आणि आता नव्या क्षेत्रांमध्ये महिला अधिकाऱ्यांसाठी स्थायी कमिशनची सुविधा सुरू झाली आहे.’
– ‘भारत अपारंपरिक ऊर्जेसाठी आपल्या साहसी आणि महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांबरोबरच जागतिक स्तरावर नेतृत्व करण्याच्या तयारीत आहे. वैयक्तिक पातळीवर आपल्यातील प्रत्येक व्यक्ती गांधीजींच्या सल्ल्यानुसार आपल्या आजूबाजूच्या परिसराला सुधारण्यासाठी आपलं योगदान देऊ शकते.’
– ‘स्वातंत्र्याचं हे पंच्याहत्तरावं वर्ष आहे. यानिमित्ताने ज्यामुळे आपल्या महान राष्ट्रीय आंदोलनाला प्रेरणा मिळाली होती, त्या जीवनमूल्यांना पुन्हा जागृत करण्याची वेळ आहे. प्रजासत्ताक दिनासारखा हा राष्ट्रीय उत्सव न जाणो किती कठोर यातना आणि बलिदानांनंतर लाभला आहे.’
ADVERTISEMENT