अरेरे! अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या मुलाला आईने परकरच्या नाडीने गळा आवळून संपवलं

मुंबई तक

• 03:08 AM • 19 Feb 2022

–स्मिता शिंदे, जुन्नर विवाहबाह्य संबंधांमध्ये अडसर ठरतो म्हणून आईने पोटच्या मुलाची परकरच्या नाडीने गळा आवळून हत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. जुन्नर तालुक्यात ही घटना घडली असून, नारायणगाव पोलिसांनी मुलालाचा जीव घेणाऱ्या निर्दयी मातेला अटक केली आहे. जुन्नर तालुक्यातील येडगाव जवळच्या भोरवाडीच्या हद्दीत सुवर्ण पॅलेस लॉजच्या बाजुला राहत असलेल्या विद्या सचिन कदम या महिलेनं […]

Mumbaitak
follow google news

स्मिता शिंदे, जुन्नर

हे वाचलं का?

विवाहबाह्य संबंधांमध्ये अडसर ठरतो म्हणून आईने पोटच्या मुलाची परकरच्या नाडीने गळा आवळून हत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. जुन्नर तालुक्यात ही घटना घडली असून, नारायणगाव पोलिसांनी मुलालाचा जीव घेणाऱ्या निर्दयी मातेला अटक केली आहे.

जुन्नर तालुक्यातील येडगाव जवळच्या भोरवाडीच्या हद्दीत सुवर्ण पॅलेस लॉजच्या बाजुला राहत असलेल्या विद्या सचिन कदम या महिलेनं २० जानेवारी रोजी पहाटे ४:३० वाजता मुलगा राज सचिन कदम (वय १३ वर्षे) हा झोपेत असताना त्याचा परकरच्या नाडीने गळा आवळला.

दरम्यान, राज कसलीही हालचाल करत नसल्यानं महिलेनं त्याला प्रथम नारायणगाव येथील खाजगी रूग्णालयात व नंतर पुण्यातील ससुन रुग्णालयात नेलं. उपचार सुरू असतानाच राजचं २७ जानेवारी २०२२ रोजी रात्री १२ वाजून ५ वा निधन झालं.

बॉयफ्रेंडच्या एक्स गर्लफ्रेंडचे न्यूड फोटो इंस्टाग्रामवर शेअर, आरोपी शोधल्यानंतर चक्रावले पोलीस

आरोपी महिला विद्या कदम हिने ससुन रुग्णालयात खोटं कारण सांगून खरी माहिती दडवली. नंतर मुलाचा अंत्यविधी केला. दरम्यान, मयत राजची कागदपत्रं पोलीस स्टेशनला प्राप्त झाली. पोलिसांनी प्राथमिक तपास केल्यानंतर आणि प्राप्त कागदपत्रांचं अवलोकन केल्यानंतर मयत राजसोबत घातपात झाल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. त्यामुळे पोलिसांनी विद्या कदमला चौकशीसाठी नारायणगाव पोलीस स्टेशनला बोलावलं.

पोलिसांनी विद्या कदमची चौकशी केली. त्यावेळी तिने उडवाउडवीची तसंच असमाधानकारक उत्तरं दिली. पोलिसांनी तिला वारंवार चौकशीसाठी बोलावलं. या दरम्यान, तिच्या बोलण्यात विसंगती असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. त्यामुळे ती काहीतरी लपवत असल्याचा संशय पोलिसांना आला. तिची अधिक सखोल चौकशी केल्यानंतर तिने कबूली दिली. स्वतःच्या मुलाचा परकरच्या नाडीने गळा आवळून खून केल्याचं विद्या कदमने पोलिसांना सांगितलं.

डोंबिवली : पुस्तक देण्याच्या बहाण्याने आलेल्या शेजारच्या तरुणाने…; त्या महिलेच्या हत्येचं गूढ उलगडलं

का केली हत्या? विद्या कदम पोलिसांना काय म्हणाली?

विद्या कदमने पोलिसांना हत्येच्या कारणाचा खुलासा केला आहे. तिला (विद्या कदम) व तिचा प्रियकर दत्तात्रय गोविंद औटी (रा. इनाममळा, बोरी बु., ता. जुन्नर, जि. पुणे) यांच्या भेटण्यात मुलगा अडथळा ठरत होता.

त्यामुळे आरोपी विद्याने मुलगा राजचा (वय १३ वर्ष) पहाटे ४:३० वाजता झोपेतच असताना परकरच्या नाडीने गळा आवळुन खुन केला. नंतर त्याच्या छातीवर प्लास्टिकच्या झाडूने मारहाण केली.

नांदेड : पत्नीसह सासरच्या मंडळीकडून छळ आणि मारहण; प्राध्यापकाने मृत्यूलाच कवटाळलं

हे सगळं घडल्यानंतर तो काहीच हालचाल होत नसल्यानं आरोपी महिलेनं त्याला नारायणगाव येथील श्री हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथे डॉक्टरांनी त्याला पुण्यातील ससुन रुग्णालयात नेण्यास सांगितलं. महिला त्याला ससुन रुग्णालयात घेवुन गेली. त्यानंतर राजचा उपचारादरम्यान २७ जानेवारी २०२२ रोजी रात्री १२ वाजता मृत्यू झाला.

याप्रकणी नारायणगाव पोलीस ठाण्यात मयत राजचे वडील सचिन शंकर कदम यांनी १७ फेब्रुवारी २०२२ रोजी फिर्याद दिली. या प्रकरणाचा तपास पो.स.ई. धनवे हे करीत आहे. ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख तसेच अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग मंदार जवळे यांच्या सूचनेनुसार नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स.ई धनवे, सहायक फौजदार केंगले, सहायक फौजदार ढमाले यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी केली.

    follow whatsapp