पुणे ग्रामीण भागातील शिरुर परिसरात एका विधवा महिलेवर ८ जणांनी सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शिरुर पोलिसांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेत ५ आरोपींना अटक केली असून उर्वरित ३ फरार आरोपींचा शोध सुरु आहे. पाचही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं असता त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
पीडित महिला ही विधवा असून ती गावात एकटीच राहते. महिलेच्या एकटेपणाचा आणि भोळ्या स्वभावाचा या आरोपींनी गैरफायदा घेतल्याचं कळतंय. सर्व आरोपी हे एकाच गावातले असून महिलेच्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेऊन तिला जिवे मारायची धमकी देत आरोपी तिच्यावर बलात्कार करायचे. त्यामुळे प्रत्येकवेळी जिवाच्या भीतीमुळे महिला घाबरुन आरोपींसोबत जायची. गेल्या सहा महिन्यांपासून आरोपींनी पीडित महिलेवर कधी घरामध्ये, उसाच्या शेतात, शाळेच्या पाठीमागे, नदीकिनारी नेऊन तिच्यावर अत्याचार केला.
दुहेरी हत्याकांडाचं गुढ उकलण्यात नागपूर पोलिसांना यश, अनैतिक संबंधाची माहिती दिल्याने केली हत्या
हा त्रास असह्य झाल्यानंतर महिलेने धीर एकवटून शिरुर पोलीस ठाण्यात याबद्दलची तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी आतापर्यंत या प्रकरणात माऊली पवार, रज्जाक पठाण, काळू वाळुंज, विठ्ठल काळे, राजेश उर्फ पप्पू गायकवाड, आकाश गायकवाड, संदीप वाळुंज आणि नवनाथ वाळुंज यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यातील पाच आरोपींना अटक करण्यात यश आलं असून उर्वरित तिघांचा शोध सुरु असल्याचं कळतंय.
धक्कादायक! औरंगाबादमध्ये तरूणाची दगडाने ठेचून हत्या, मृतदेहाचा अर्धा भाग जाळला
ADVERTISEMENT