नवी दिल्ली: कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान, राहुल गांधींनी कोरोनावरुन केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. कोरोना विषयी श्वेतपत्रिका राहुल गांधी यांनी जारी केली. तसेच तिसर्या लाटेबाबत सरकारला अनेक सल्लेही दिले.
ADVERTISEMENT
राहुल गांधी म्हणाले की, ‘कोरोनाच्या दुसर्या लाटेबाबत वैज्ञानिकांनी आधीच इशारा दिला होता. परंतु सरकारने कोणतीही तयारी केली नाही. संपूर्ण देशाला ठाऊक आहे की तिसरी लाट येणार आहे, परंतु आपण पुन्हा तीच चूक करीत आहोत. बेड, ऑक्सिजन आणि इतर गोष्टी तयार केल्या पाहिजेत ज्या गोष्टी आपण दुसरी लाट येण्यापूर्वी केल्या नव्हत्या. पण आता तिसरी लाट येण्यापूर्वी त्या केल्या पाहिजेत.’
‘Covid Appropriate Behavior न पाळल्यास भारतात 6 ते 8 आठवड्यात तिसरी लाट’
राहुल गांधींनी सुचवल्या चार गोष्टी
कॉंग्रेसच्या श्वेतपत्रिकेबद्दल राहुल गांधी म्हणाले की, ‘यामध्ये तिसरी लाट येण्यापूर्वीची तयारी, दुसर्या लाटेतील कमतरता, आर्थिक मदत या गोष्टींचा समावेश आहे. जेणेकरून तिसरी लाट येईल तेव्हा सर्वसामान्यांना कमीत कमी त्रास सहन करावा लागेल.’
‘सरकारने भरपाईची व्यवस्था करावी, ज्यांच्या कुटुंबातील व्यक्ती कोरोनामुळे मरण पावल्या आहे त्यांना मदत केली गेली पाहिजे.’ असंही राहुल गांधी यावेळी म्हणाले आहेत.
‘मनमोहनसिंग यांची सरकारने उडवली होती खिल्ली’
‘लसीकरण हा एकच तोडगा आहे. काल एका दिवसात लसीकरणासंबंधी कामे चांगली झाली. परंतु, हे केवळ एका दिवसासाठीच नाही तर दररोज केले पाहिजे. जेणेकरुन प्रत्येकाला लस दिली जाईल. लसीकरणाच्या बाबतीत भाजप-कॉंग्रेसमधील राज्यांचे विभाजन करू नका प्रत्येकाला लस देण्याची गरज आहे.’ असं म्हणत राहुल गांधी एक प्रकारे सरकारवर टीका केली आहे.
‘आमची श्वेतपत्रिका ही फक्त चुका उघड करणार आहे. जर सरकारने यामधील इनपुट घेतले तर सरकारला फायदा होईल. जेव्हा मनमोहनसिंग यांनी सल्ला दिला होता तेव्हा सरकारच्या मंत्र्यांनी त्यांची खिल्ली उडविली होती. पण दोन महिन्यांनंतर सरकारलाही तेच करावे लागले आहे.’ असंही राहुल गांधी म्हणाले.
Vaccination for Children: कोरोनाची तिसरी लाट आणि मुलांसाठी लस… जाणून घ्या याविषयी
‘पंतप्रधान मोदी आधीच मार्केटींगमध्ये घुसले’
‘कोरोनाच्या दुसर्या लाटेत अशा अनेकांनी आपला जीव गमावला आहे, ज्यांना खरं तर आपल्याला वाचवता येऊ शकलं असतं. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे ऑक्सिजनची कमतरता, रुग्णालयांमध्ये बेडची कमतरता. सरकारने यासाठी आधी तयारी करायला हवी होती. त्यामुळे आता तिसर्या लाटेची आधीपासूनच तयारी करावी लागेल.
‘कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी म्हणाले की, केवळ खासगी रूग्णालयातच पैसे द्यावे लागतात, देशांमध्ये बाकी सर्व ठिकाणी लस मोफत दिली जात आहे.’
‘यापूर्वीही पंतप्रधान मोदी हे मार्केटिंगमध्ये गुंतले होते. ज्याचे परिणाम देशाला भोगावे लागले आहेत.’ असं म्हणत राहुल गांधींनी मोदींवर टीका केली.
ADVERTISEMENT