राहुल गांधींच्या वीर सावरकरांविषयीच्या वक्तव्यामुळे देशाची मान खाली गेली-चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई तक

• 09:15 AM • 17 Nov 2022

राहुल गांधी यांनी वीर सावरकरांबाबत जे वक्तव्य केलं त्यामुळे देशाची मान खाली गेली आहे अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा इतिहास दडपण्याचा प्रयत्न आहे. काँग्रेसला देशाची जनता माफ करणार नाही. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेतून जे कमावलं ते गमावलं आहे राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेतून जे काही […]

Mumbaitak
follow google news

राहुल गांधी यांनी वीर सावरकरांबाबत जे वक्तव्य केलं त्यामुळे देशाची मान खाली गेली आहे अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा इतिहास दडपण्याचा प्रयत्न आहे. काँग्रेसला देशाची जनता माफ करणार नाही.

हे वाचलं का?

राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेतून जे कमावलं ते गमावलं आहे

राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेतून जे काही एक-दोन टक्के कमावलं ते वीर सावरकर यांच्या वक्तव्यामुळे गमावलं आहे. राहुल गांधी यांचा निषेध करता येईल तेवढा थोडा आहे असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंबाबत काय म्हणाले आहेत चंद्रशेखर बावनकुळे?

जेव्हा राजीव गांधी यांची जयंती किंवा पुण्यतिथी असते तेव्हा उद्धव ठाकरे त्यांना आदरांजली देतात परंतु आज मला राहुल गांधी यांनी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली दिल्याचं,प्रतिमेचे पूजन केलं असं दिसत नाही. उद्धव ठाकरेंनी आपला पक्ष पूर्ण काँग्रेसच्या वेठीस बांधला आहे. काँग्रेस पक्षाला उद्धव ठाकरे समर्पित झाले आहे. वीर सावरकरांबद्दल इतकं आक्षेपार्ह विधान केल्यामुळे भारत जोडो यात्रेचा बहिष्कार उद्धव ठाकरेंनी करायला हवा होता. आदित्य ठाकरे यांना भारत जोडो यात्रेत पाठवून उद्धव ठाकरे यांनी फक्त काँग्रेसचे संविधान स्वीकारायचं बाकी राहिलं आहे.

वीर सावरकर यांच्याबाबत काय म्हणाले होते राहुल गांधी?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इंग्रजांना मदत करत होता, तर सावरकरांना इंग्रजांकडून भत्ता मिळत होता. हे एतिहासिक तथ्य आहे की, स्वातंत्र्याच्या लढाईत हे कुठेही दिसले नाहीत. हे सत्य भाजपच्या नेत्यांनी मान्य करावं. काँग्रेस पक्षातील नेत्यांनी स्वातंत्र्याच्या लढाईत इंग्रजांविरोधात लढा दिला. अनेक वर्ष त्यांना तुरुंगात राहावं लागलं. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु, वल्लभभाई पटेल यांच्यासह अनेक नेत्यांनी इंग्रजांविरोधात लढा दिला. द्वेष पसरणारे व्यक्ती कोण आहेत आणि ते कोणत्या समाजातून आले, याचा काहीही फरक पडत नाही. द्वेष आणि हिंसा पसरवणे हे देशाविरोधी कार्य आहे. आम्ही त्या प्रत्येक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीविरोधात लढणार आहोत. हे वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं. आज देवेंद्र फडणवीस यांनी या टीकेला उत्तर दिलं आहे.

नेमकं काय म्हणाले आहेत उद्धव ठाकरे?

वीर सावरकरांचा अपमान झाल्यानंतर तो मुद्दा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला याचा मला आनंद वाटतो. आदरणीय वीर सावरकर यांच्याबाबत आमच्या मनात अत्यंत आदर आणि श्रद्धा आहेच. ती कुणीही पुसायचं ठरवलं तरीही ती पुसता येणार नाही. स्वातंत्र्यवीराबाबत ते प्रश्न विचारत आहेत ज्यांच्या मातृसंस्थेच्या मुलांचा किंवा पिल्लांचा स्वातंत्र्यांशी काहीही संबंध नाही. स्वातंत्र्यवीरांबाबत असं प्रेम व्यक्त करणं हे हास्यास्पद आहे. RSS स्वातंत्र्य लढ्यापासून लांब होते. त्यामुळे त्यांनी याबाबत बोलू नये.

आम्ही एकत्र आलो आहोत कारण

स्वातंत्र्यवीरांनी ज्या स्वातंत्र्यासाठी त्याग केला ते स्वातंत्र्यच आज धोक्यात आलं आहे. त्यातून बाहेर पडण्याच्या महत्त्वाच्या उद्देशाने आम्ही एकत्र आलो आहोत. त्यामुळे हा बाष्कळपणा त्यांनी बंद करावा आणि आधी स्वातंत्र्यलढ्यात आधी आपल्या मातृसंस्थेचं योगदान काय ते सांगावं. राहुल गांधी जे बोलले ते आम्हाला मान्य नाही. मात्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ज्या स्वातंत्र्यासाठी आपलं आयुष्य वेचलं ते स्वातंत्र्यच आज धोक्यात आलं आहे. तुम्ही ज्या मेहबुबा मुफ्तींसोबत पाट लावला होतात त्या भारतमाता की जय किंवा वंदे मातरम म्हणणार आहेत का? असा खोचक प्रश्नही उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.

    follow whatsapp