मुंबई: मुंबई पोलीस क्राईम ब्राँच सध्या पॉर्नोग्राफी प्रकरणी अतिशय बारकाईने तपास करत आहे. या प्रकरणात प्रत्येक पैलूवर त्यांनी लक्ष ठेवलं आहे. या प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. पोलीस सातत्याने या प्रकरणाशी निगडित लोकांची चौकशी करत आहेत. याच प्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राला मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्राँचच्या प्रॉपर्टी सेलने समन्स पाठवलं आहे. शर्लिनला आज (6 ऑगस्ट) चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
शर्लिनने राज कुंद्रावर केले आहेत आरोप
शर्लिनने राज कुंद्रावर अनेक आरोपही केले आहेत. शर्लिनच्या मते, राज कुंद्राने तिला अडल्ट मूव्हीच्या व्यवसायात ढकलले आहे. राजने तिला अडल्ट कंटेंटमध्ये काम करण्यास सांगितले होते. पहिले एक रोल देखील ऑफर केली होती. त्यानंतर तिला अडल्ट कंटेंट बनविण्यास सांगितलं होतं. राजने तिला त्याच्या हॉटशॉट अॅपसाठी शूट करायला सांगितले होते. मात्र, शर्लिन चोप्राने यासाठी नकार दिला होता.
शर्लिनचा आर्म्सप्राईम मीडियाशी करार
रिपोर्ट्सनुसार, शर्लिन चोप्राचा राज कुंद्राच्या फर्म आर्म्सप्राईम मीडियाशी करार होता. हा करार भारताबाहेरील कंपन्यांच्या काही अॅप्ससाठी अश्लील कंटेट पुरवण्यासाठी होता.
शर्लिनचे माजी वकील चरणजित चंद्रपाल यांच्या म्हणण्यानुसार, शर्लिन तिचे अॅप सेमी पॉर्नोग्राफीसह चालवत असे. हे पार्टटाइम काम फारसे चालत नव्हते आणि काही काळ शर्लिनची राज कुंद्राशी भेट झाली होती. राज कुंद्रा याने शर्लिनला सांगितले होते की तिला 50% नफा मिळेल. राज यांनी स्वतः हा करार केला होता. सुरुवातीला चांगली कमाई होते, पण नंतर शर्लिनला वाटले की तिला करारानुसार पैसे मिळत नाहीत. त्यामुळे तिने हा करार संपुष्टात आणला.
Big News : Shilpa Shetty चा पती राज कुंद्राला अटक, अश्लील फिल्म प्रकरणी कारवाई
19 जुलैला राज कुंद्राला झाली होती अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज कुंद्रा हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. पोलिसांनी 19 जुलै रोजी दोन तासांच्या चौकशीनंतर राज कुंद्राला अटक केली होती. यानंतर तो आता न्यायालयीन कोठडीत आहे. आता राज कुंद्राचे अनेक व्हॉट्सअॅप ग्रुप चॅट्सही समोर येत आहेत, ज्यात तो मॉडेल्सच्या पेमेंटबद्दल बोलत असल्याचे दिसून येत आहे.
ADVERTISEMENT