काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. वीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवास स्थानी भेट घेतली.राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी ही भेट झाली. भारत जोडो यात्रेतील राहुल गांधी यांच्या विधानानंतर होणारी ही भेट महत्वपूर्ण मानली जाते आहे.
ADVERTISEMENT
राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांचा निषेध
राहुल गांधी यांनी वीर सावरकरांबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यामुळे भारत जोडो यात्रेला वेगळं वळण लागलं. भाजपने ही यात्रा बंद करण्याची मागणी केली होती. तसंच राहुल गांधी यांच्याविरोधात विविध ठिकाणी गुन्हाही दाखल करण्यात आला. मनसेने शेगाव ठिकाणी जाऊन राहुल गांधी आणि त्यांच्या यात्रेला काळे झेंडे दाखवले. यानंतर आज रणजीत सावरकर यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे.
राज ठाकरेंच्या भेटीनंतर काय म्हणाले रणजीत सावरकर?
राहुल गांधींच्या विरोधात जी निषेधाची आंदोलनं झाली. त्यातलं सर्वात महत्त्वाचं आंदोलन शेगावमध्ये मनसेने केले. राहुल गांधी यांच्या सभेत मनसेचे कार्यकर्त्यांनी धडक मारली आणि त्यांना निषेधाचे झेंडे दाखवले. माझ्यासाठी ही बाब महत्त्वाची आहे. आज मी याचसाठी राज ठाकरे यांचे आभार मानले. आमची याच विषयावर चर्चा झाली असं रणजीत सावरकर यांनी सांगितलं. संजय राऊत यांनी काय वक्तव्य केलं ते सगळं असूदेत मी त्यावर आत्ता काही बोलणार नाही. मात्र राज ठाकरे यांनी जी आक्रमक भूमिका घेतली त्याचसंदर्भात मी आज त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी जे धडक आंदोलन केलं त्यासाठी मी धन्यवाद दिले असं रणजीत सावरकर यांनी म्हटलं आहे.
वीर सावरकर यांच्याबाबत काय म्हणाले होते राहुल गांधी?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इंग्रजांना मदत करत होता, तर सावरकरांना इंग्रजांकडून भत्ता मिळत होता. हे एतिहासिक तथ्य आहे की, स्वातंत्र्याच्या लढाईत हे कुठेही दिसले नाहीत. हे सत्य भाजपच्या नेत्यांनी मान्य करावं. काँग्रेस पक्षातील नेत्यांनी स्वातंत्र्याच्या लढाईत इंग्रजांविरोधात लढा दिला. अनेक वर्ष त्यांना तुरुंगात राहावं लागलं.
महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु, वल्लभभाई पटेल यांच्यासह अनेक नेत्यांनी इंग्रजांविरोधात लढा दिला. द्वेष पसरणारे व्यक्ती कोण आहेत आणि ते कोणत्या समाजातून आले, याचा काहीही फरक पडत नाही. द्वेष आणि हिंसा पसरवणे हे देशाविरोधी कार्य आहे. आम्ही त्या प्रत्येक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीविरोधात लढणार आहोत. हे वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं.
ADVERTISEMENT