बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री रत्ना पाठक यांनी बेरंग गाण्यात दीपिकाने घातलेल्या कपड्याच्या रंगावरुन सुरु असलेल्या वादावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या रत्ना पाठक शहा त्या दिवसाची वाट पाहत आहेत जेव्हा लोक द्वेषाने कंटाळतील आणि शेवटी आशेकडे वळतील. रत्ना यांचा विश्वास आहे की, आज जिथे प्रत्येक गोष्टीला राजकीय अँगल दिला जात आहे, हिंदी चित्रपटसृष्टी दिवसेंदिवस द्वेषाचा सामना करत आहे, तिथे सकारात्मकता येईल. एक दिवस हे सर्व संपेल. रत्ना पाठक शाह यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, ‘पठाण’ चित्रपटातील बेशरम रंग या गाण्याच्या वादात लोकांकडे खायला अन्न नाही, पण दुसऱ्याच्या कपड्यांवर वाद घालायला हे विसरत नाही.
ADVERTISEMENT
कोणत्या रंगाचे कपडे घालता याने काही फरक पडत नाही : रत्ना पाठक
इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत रत्ना पाठक म्हणाल्या की, एक कलाकार म्हणून तुम्ही कोणत्या रंगाचे कपडे घालता याने काही फरक पडत नाही. हा विषय बोलण्यासारखा नाही. रत्ना म्हणाल्या, आपण मोठ्या अज्ञानाच्या काळात जगत आहोत. या सगळ्या गोष्टी मनात घोळत राहिल्या तर काहीच बरोबर होणार नाही. ही अशी गोष्ट नाही की, ज्याबद्दल मी जास्त बोलू इच्छिते किंवा जास्त महत्त्व देऊ इच्छिते, असं त्या म्हणाल्या.
कधीतरी हा द्वेशाचं वातावरण संपेल : रत्ना पाठक
रत्ना पुढे संभाषणात म्हणाल्या, मला वाटते या जगात जेवढे लोक सक्रिय दिसत आहेत त्यापेक्षा जास्त संवेदनशील लोक आहेत. ते बाहेर येतील कारण जे घडत आहे ती भीतीची भावना आहे, बहिष्काराची भावना आहे, जी टिकाऊ नाही. हे फार काळ टिकणार नाही. मला वाटतं एखादी व्यक्ती असा द्वेष काही काळच सहन करू शकते. प्रत्येकाच्या मनात बंडखोरी असते, पण मग तुम्ही द्वेषाने कंटाळता. मी तो दिवस येण्याची वाट पाहत आहे, असं त्या म्हणाल्या.
बेरंग गाण्यातील दीपिकाच्या कपड्याच्या रंगवरून वाद
गेल्या काही वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टी सतत द्वेषाला बळी पडत आहे. अनेक चित्रपटांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलनेही झाली. पठाण चित्रपटातील गाण्याबाबतही असेच झाले. उजव्या विचारसरणीच्या लोकांनी आदल्या दिवशीच चित्रपटाला विरोध केला. शाहरुखच्या डंकी चित्रपटाच्या सेटवर हा निषेध करण्यात आला. अभिनेत्याचे जबलपूरमध्ये शूटिंग सुरू असल्याचे आंदोलकांना समजताच लोक तेथे पोहोचले आणि त्यांनी गोंधळ घातला.
ADVERTISEMENT