‘ती’ दर्गा हटवा, नाहीतर मंदिर उभारणार, राज ठाकरेंचा सरकारला इशारा

मुंबई तक

22 Mar 2023 (अपडेटेड: 24 Mar 2023, 06:56 AM)

Raj thackeray Gudhi padwa melava : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतिर्थावर ठाकरी तोफ धडाडली.यावेळी गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी भोंग्यांच्या मुद्यावर पुन्हा एकदा आक्रमक पावित्रा घेतला.यासह लाव रे तो व्हिडिओमध्ये त्यांनी माहिमच्या खाडीत बांधलेल्या अनधिकृत दर्ग्याचा व्हिडिओ दाखवत ती हटवण्याची मागणी केली. जर यावर कारवाई झाली नाही, तर त्याच्या बाजूला गणपती मंदिर उभारणार असाच […]

Mumbaitak
follow google news

Raj thackeray Gudhi padwa melava : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतिर्थावर ठाकरी तोफ धडाडली.यावेळी गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी भोंग्यांच्या मुद्यावर पुन्हा एकदा आक्रमक पावित्रा घेतला.यासह लाव रे तो व्हिडिओमध्ये त्यांनी माहिमच्या खाडीत बांधलेल्या अनधिकृत दर्ग्याचा व्हिडिओ दाखवत ती हटवण्याची मागणी केली. जर यावर कारवाई झाली नाही, तर त्याच्या बाजूला गणपती मंदिर उभारणार असाच इशाराच त्यांनी सरकारला दिला आहे. (Remove that dargah, otherwise a temple will be built, Raj Thackeray warns the government)

हे वाचलं का?

गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी दोन व्हिडिओ दाखवले. यातील पहिल्या व्हिडिओत त्यांनी जावेद अख्तरच्या पाकिस्तानातील मुलाखतीची क्लिप दाखवली. या क्लिपमध्ये त्यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन भारताच्या बाजूने घेतलेल्या मुलाखतीचे कौतूक केले. तसेच असा मुसलमान मला हवाय अशा शब्दात त्यांनी जावेद अख्तरचे कौतूक केले.

“उद्धवला ओबेरॉयमध्ये घेऊन गेलो अन् विचारलं”; राज ठाकरेंनी सांगितला ‘तो’ प्रसंग

लाव रे तो व्हिडिओत मोठी पोलखोल

दुसऱ्या लाव रे तो व्हिडिओमध्ये राज ठाकरे यांनी एका गंभीर विषयाकडे संपुर्ण महाराष्ट्र आणि राजकिय वर्तुळाते लक्ष वेधले. या व्हिडिओत माहिमच्या खाडीत एक दर्गा उभारल्याचे दृष्य दाखवले गेले. ही दर्गा कोणाच्या परवानगीने उभारली असा सवाल देखील राज ठाकरे यानी यानिमित्त उपस्थित केला.

आता काय नवीन हाजीअली तयार करणार का?,कसला दर्गा, कोणाची समाधी, माशाची अशी खिल्ली देखील राज ठाकरे यांनी यावेळी उडवली. तुमच्या डोळ्यादेखत हे घडतंय, समुद्रामध्ये गेल्या दोन वर्षात उभं केले गेले आहे. याच्याजवळच माहिम पोलिस स्टेशन, असे देखील राज ठाकरे म्हणाले. जर महिन्याभरात यावर कारवाई झाली नाही, तर त्याच्याबाजूला गणपती मंदिर उभारू, यांना अशा सवलत देत असाल तर आमच्याकडे दुर्लक्ष करा, असा इशाराच राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालिका आयुक्त इक्बाल चहल आणि पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिला.

17000 मनसैनिकांवर गुन्हे मागे घ्या

भोंग्यावरून देखील राज ठाकरे पुन्हा एकदा आक्रमक झाले होते. मशिदीवरील भोंगे पुन्हा एकदा वाजायला लागले आहेत. एकदाचा निर्णय़ घ्या, एकतर तुम्ही सांगा नाहीतर, आम्ही भोंगे बंद करू,असे आव्हानच त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. तसेच हा विषय मी सोडलेला नाही आहे. त्यामुळे मी पुन्हा मुख्यमंत्र्यांना भेटणार असे देखील राज ठाकरे यांनी सांगितले. तसेच 17000 मनसैनिकांवर गुन्हे दाखल हे गुन्हे मागे घ्या, असे देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

    follow whatsapp