पुण्यात रिक्षाचा प्रवास महागला, किमान भाडे आता 21 रूपये

मुंबई तक

• 03:49 PM • 16 Nov 2021

पुण्यात रिक्षाचा प्रवास महाग झाला आहे. पुण्यात दीड किमी प्रवासासाठी आता किमान भाडे हे 21 रूपये लागणार आहेत. आधी हे भाडे 18 रूपये होतं. पुणे, पिंपरी चिंचवड आणि बारामती प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांची संयुक्त बैठक झाली आहे. त्यामध्ये हा निर्णय झाला आहे. 22 तारखेपासून ही भाडेवाढ होणार आहे. रात्री बारा ते पहाटे पाच या वेळेत […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

पुण्यात रिक्षाचा प्रवास महाग झाला आहे. पुण्यात दीड किमी प्रवासासाठी आता किमान भाडे हे 21 रूपये लागणार आहेत. आधी हे भाडे 18 रूपये होतं. पुणे, पिंपरी चिंचवड आणि बारामती प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांची संयुक्त बैठक झाली आहे. त्यामध्ये हा निर्णय झाला आहे. 22 तारखेपासून ही भाडेवाढ होणार आहे. रात्री बारा ते पहाटे पाच या वेळेत 25 टक्के भाडेदर जास्त असणार आहे.

हे वाचलं का?

14 ऑक्टोबरलाच झाली होती भाडेवाढ

पुण्यातल्या रिक्षा भाड्यामध्ये 14 ऑक्टोबरलाच वाढ झाली आहे. ही भाडेवाढ पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामती या तिन्ही क्षेत्रांसाठी लागू असणार आहे. पुणे परिवहन कार्यालयातर्फे याबद्दलची माहिती देण्यात आली होती. आता आज पुन्हा एकदा भाडेवाढ झाली आहे.

महापालिका क्षेत्रात रात्री 12 ते पहाटे 5 या कालावधीत 25 टक्के भाडेवाढ अनुज्ञेय असणार आहे.

महापालिका क्षेत्र सोडून ग्रामीण भागासाठी रात्री 12 ते पहाटे 5 या कालावधीत 40 टक्के अतिरिक्त भाडेवाढ अनुज्ञेय

प्रवाशांसोबत असलेल्या सामानासाठी 60 40 सेमी किंवा त्यापेक्षा मोठ्या आकाराच्या मोठ्या नगाच्या बॅगेसाठी ३ रूपये शुल्क लागणार आहे.

22 नोव्हेंबपासून जे ऑटो रिक्षाचालक पुनःप्रमाणीकरण करून घेतील त्याच रिक्षा धारकांना ही भाडेवाढ करता येणार आहे.

जे रिक्षाचालक पुनःप्रमाणीकरण करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

    follow whatsapp