ADVERTISEMENT
गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंतची गर्लफ्रेंड ईशा नेगी असल्याची चर्चा आहे.
सोशल मीडियावर ऋषभ पंत ईशा नेगीला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे.
ईशा नेगीचा 20 फेब्रुवारी रोजी वाढदिवस झाला. यावेळी तिला अनेकांनी भरभरून शुभेच्छा दिल्या.
भारतीय क्रिकेटपटूंच्या लाइफ पार्टनर्सनीसुद्धा इंस्टाग्रामवर ईशा नेगीचे फोटो पोस्ट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
इशांत शर्माची पत्नी प्रतिमा, सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा, अक्षर पटेलची पत्नी मेहा यांनीही ईशाला शुभेच्छा दिल्या.
ईशा नेगीच्या वाढदिवसानिमित्त चाहते ऋषभ पंतच्या शुभेच्छांची वाट पाहत होते.
कार अपघातानंतर ऋषभ पंत रिकव्हरी मोडमध्ये आहे. यावेळी ईशाला पंतने शुभेच्छा दिल्या की नाही हीच चर्चा होती.
ऋषभने नुकतेच त्याच्या रिकव्हरीचे फोटो शेअर केले, त्यावेळी ईशा नेगीने फोटो लाईक करत, कमेंटमध्ये फायटर असं लिहिलं होतं.
ADVERTISEMENT